{"product_id":"मानवी-भूगोल-2","title":"मानवी भूगोल","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवी भूगोल ही भूगोलाची एक प्रमुख शाखा असून यामध्ये मानव आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो. मानवाला केंद्रस्थानी मानून भूगोलाचा अभ्यास करताना मानवाच्या प्रत्येक कार्यावर, क्रियेवर, वर्तनावर, बौध्दिक क्षमतेवर आणि एकुणच कार्यक्षमतेवर विविध भौगोलिक घटकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे प्रभाव पडतो. हे सर्व भूगोलवेत्यांनी सप्रमाण सिध्द केलेले आहे. यातूनच संपुर्ण जगात मानवी भूगोलाच्या अध्ययन आणि अध्यापनाला मोठया प्रमाणावर महत्त्व प्राप्त झाले. भारतासारख्या विकसनशील देशात मानवी भूगोलाच्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळेच भारतातील अनेक विद्यापीठातील सर्व महाविद्यालयामध्ये पदवी व पदव्युत्तर स्तरावर मानवी भूगोलाचे अध्ययन व अध्यापन केले जात आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विद्यापीठातून मानवी भूगोल शिकविण्यात येत आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तूत ग्रंथामध्ये मानवाची जीवनशैली स्पष्ट करण्यासाठी मानवी भूगोलाचा अर्थ, व्याख्या, स्वरुप व व्याप्ती, मानवी भूगोलाच्या शाखा, मानवाचे पर्यावरणाशी असलेले सहसंबंध, मानवी भूगोलातील प्रमुख विचारधारा, मानवी वंश, वांशिक समुह, जगातील प्रमुख वंश, ग्रिफित टेरलने केलेले मानवी वंशाचे वर्गीकरण तसेच निवडक प्रदेशातील मानवाची जीवनशैली, भारतातील आदिवासी जमातींचे भौगोलिक घटकांशी असलेली बांधिलकी इत्यादी घटकांविषयी सविस्तर विचार मांडण्यात आलेले आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474473726181,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manavi-bhugol-1.jpg?v=1772100853","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2-2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}