{"product_id":"मायेची-सावली-कमलाताई-बाई","title":"मायेची सावली कमलाताई (बाई)","description":"\u003cp\u003eकमलताई नावाप्रमाणेच वेगळेपण जपून होत्या. ‘कमल’ म्हणजे चिखलात फुलूनही चिखलापासून अलिप्त राहते असे पुष्प, कमलताईंचे नाव या अर्थाने सार्थ होते. त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा जीवनपट आपल्या समोर मांडतांना आमच्याही भावना उचंबळून आल्या आहेत. कै.सौ.कमलताईंनी बालपणापासून समर्थपणे निभावलेल्या विविध कौटुंबिक, सामाजिक भूमिकांचा आम्ही या चरित्रवजा ग्रंथात यथोचित आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे मातृहृदयी सोशिक, खंबीर, दमदार, भारदस्त आणि निर्गवी व्यक्तीमत्वाच्या कमलताईंच्या विविध छटा त्यांच्या व्यक्तीमत्वाला उच्चकोटीची झळाळी प्राप्त करून देतात. त्यांचे दिलखुलास वागणे, वातावरणात प्रसन्नतेचे तुषार सदोदीत शिंपडीत जाणे, संपर्कात येणाऱ्या मनुष्यप्राण्याच्या जीवनात आनंदाचे कारंजे फुलवत जाणे, प्रत्येक भूमिका समरसून जगताना समाजातील विविध स्तरांतील जनमाणसाशी असलेले कमलताईंचे भावबंध, गुरुवरची अपार श्रद्धा अशा विविधांगी भूमिकांचे कंगोरे या चरित्रात्मक लेखनातून आपल्या भेटीला येणार आहेत. अत्युच्च कसोटीच्या क्षणी जीवनात खचल्यासारखे वाटले तरी कोलमडायचे नाही, प्रत्येक भल्याबुऱ्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जायचे हा वस्तुपाठ कमलताईंच्या जीवनाचा अविभाज्य पैलू होता!              \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48876139086053,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MayechiSavaliKamaltai_Bai__SanpadakMandal-1.jpg?v=1776774358","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%88","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}