{"product_id":"मूलभूत-जैविक-मानसशास्त्र-fundamental-bio-psychology","title":"मूलभूत जैविक मानसशास्त्र (Fundamental Bio Psychology)","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार, 2025-2026 या वर्षापासून टी.वाय.बी.ए. (सत्र-5) मानसशास्त्र विषयाकरीता नविन अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे. \u003cbr\u003eनवीन अभ्यासक्रम आला की, विद्यार्थ्यांची तारांबळ उडणे साहजिक आहे. कारण नव्या अभ्यास क्रमात काळानुरूप नव्या बाबी बहुतेक करून समाविष्ट झालेल्या असतात. त्याचे अवलोकन व अभ्यास करताना अनेक पुस्तके व संदर्भ ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. कोणताही घटक हा एका पुस्तकातून पूर्ण होत नाही. त्यातून वेळ, पैसा, श्रम हे जास्तीचे खर्च होतात, ही अडचण लक्षात घेता अभासक्रमावर आधारीत विद्यार्थ्यांची ज्ञानाची गरज पूर्ण व्हावी. या हेतूने ‘मूलभूत जैविक मानसशास्त्र’ या पुस्तकाचे प्रयोजन आहे.\u003cbr\u003eमानवी वर्तन, विचार, भावना आणि मानसिक प्रक्रियांमागील जैविक घटकांचा अभ्यास करणारी महत्त्वपूर्ण ज्ञानशाखा म्हणजे जैविक मानसशास्त्र होय. मानवी मेंदू, चेतासंस्था, मज्जापेशी, अनुवंशिकता आणि अंतःस्रावी ग्रंथी यांचा मानवी वर्तनावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी या विषयाचे विशेष महत्त्व आहे.\u003cbr\u003eप्रस्तुत ‘जैविक मानसशास्त्र’ या पुस्तकात जैविक मानसशास्त्राची ओळख, स्वरूप, व्याप्ती, अनुवंश आणि वर्तन, संशोधन पद्धती, न्यूरोइमेजिंग तसेच चेतासंस्थेची रचना व कार्ये यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर मज्जापेशी, चेतापारेषके, मेंदूचे पाश्वीकरण, मध्यवर्ती व परिघीय चेतासंस्था, अंतःस्रावी ग्रंथी आणि संप्रेरके यांचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे.\u003cbr\u003eविद्यार्थ्यांना विषयातील संकल्पना सहज समजाव्यात, या उद्देशाने पुस्तकाची मांडणी सोप्या, सुबोध व शास्त्रीय भाषेत करण्यात आली आहे. हे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक व अभ्यासकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":68324058956005,"sku":"9789377763497","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/JaivikManasshastra_KalpanaNagre-1.jpg?v=1795515545","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%a4-%e0%a4%9c%e0%a5%88%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-fundamental-bio-psychology","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}