{"product_id":"मूलभूत-सांख्यिकी-basic-statistics","title":"मूलभूत सांख्यिकी (Basic Statistics)","description":"\u003cp\u003eसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विविध विद्याशाखांतर्गत पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत श्रेयांक व सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून तृतीय वर्ष कला (TYBA) अर्थशास्त्र विषयातील Major DSE, Theory-EL (B), अंतर्गत सत्र-5 साठी संकेतांक:- 613211 नुसार ‘मूलभूत सांख्यिकी’ हा विषय 4 श्रेयांकांसाठी निश्चित करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना विषयाचे सैद्धांतिक ज्ञान तसेच प्रत्यक्ष माहितीचे विश्लेषण करता यावे, या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.\u003cbr\u003eया पुस्तकामध्ये अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा अत्यंत सोप्या, सुबोध व सविस्तर भाषेत आढावा घेतला आहे. पुस्तकातील घटक 1 मध्ये सांख्यिकीची व्याख्या, व्याप्ती, महत्त्व, मर्यादा व अर्थशास्त्रातील तिची कार्ये मांडली आहेत. घटक 2 मध्ये सामग्री संकलनाचे प्रकार: प्राथमिक व दुय्यम, आणि संकलनाच्या पद्धती: जनगणना, नमुना निवड, प्रश्नावली व अनुसूची स्पष्ट केल्या आहेत. घटक 3 मध्ये सामग्रीचे वर्गीकरण, सारणीयन आणि वारंवारता वितरणाची मांडणी केली आहे. घटक 4 व 5 मध्ये अनुक्रमे केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे : समांतर मध्य, मध्यका व बहुलक आणि अपस्करणाची परिमाणे: मध्य विचलन व प्रमाण विचलन, या घटकांचे गणितीय स्पष्टीकरण व उपयोग समाविष्ट केले आहेत. तसेच घटक 6 मध्ये निर्देशांकाचा अर्थ, प्रकार आणि त्याच्या रचनेच्या पद्धती यांचा सखोल समावेश करण्यात आला आहे.\u003cbr\u003eया पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना केवळ पाठांतरावर आधारित ज्ञान न देता, सांख्यिकीय पद्धतींचे व्यावहारिक उपयोजन, गणितीय संकल्पनांचे स्पष्टीकरण आणि माहितीचे शास्त्रीय विश्लेषणात्मक आकलन व्हावे यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच अर्थशास्त्रातील विविध संकल्पना, आकडेवारी, तक्ते, आलेख व त्यांचे विश्लेषण करणे सुलभ व्हावे यासाठी आवश्यक ठिकाणी उदाहरणे आणि स्पष्टीकरणांचा वापर करण्यात आला आहे. तसेच, या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मूल्यांकनासाठी नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने विविध प्रकारचे प्रश्न देण्यात आले आहेत. दीर्घोत्तरी \u003cbr\u003eप्रश्न, लघुत्तरी प्रश्न, टिपा, संकल्पनात्मक प्रश्न तसेच आवश्यक त्या ठिकाणी तक्ते व आकृत्यांच्या आधारे सराव करण्यासाठी प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन, लेखनकौशल्य, आकडेवारीचे विश्लेषण आणि परीक्षेची तयारी या सर्व बाबतीत हे पुस्तक उपयुक्त ठरेल \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":68323162161381,"sku":"9789377763282","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MulbhutSankhyiki_Aadhav-1.jpg?v=1795511651","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%80-basic-statistics","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}