{"product_id":"मृदा-भूगोल-आणि-प्रात्यक्षिके-soil-geography-and-practicals","title":"मृदा भूगोल आणि प्रात्यक्षिके (Soil Geography and Practicals)","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eविद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठाने सन 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून तृतीय वर्ष कला (T.Y.B.A.) या वर्गासाठी लागू केलेल्या NEP 2020 नुसार मुख्य भूगोलाच्या (Major and Elective) सुधारित अभ्यासक्रमानुसार ‘मृदा भूगोल आणि प्रात्यक्षिके’ हे पुस्तक लिहिण्यात आले असून सदर पुस्तक विद्यार्थी आणि प्राध्यापक बंधू-भगिनींच्या हाती सुपूर्द करताना आम्हास अतिशय आनंद होत आहे. विशेष भूगोल विषयामधील मृदा भूगोलातील माहिती आणि त्यासंबंधी प्रात्यक्षिक कौशल्ये विद्यार्थ्यांना अवगत होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळाने अतिशय जाणीवपूर्वक निर्णय घेऊन मृदा भूगोल आणि प्रात्यक्षिके या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. \u003cbr\u003eमृदा भूगोलातील तज्ञ, अभ्यासक, संशोधक यांच्याशी चर्चा करून आणि त्यासंबंधित संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवरील उपलब्ध माहिती, वर्तमानपत्रातील लेख, अहवाल, चर्चासत्रे, परिषदा, शोधनिबंध इ. आधार घेऊन सदर पुस्तकाचे लिखाण केले आहे.\u003cbr\u003eपुस्तकामध्ये मृदा भूगोलांतर्गत मृदा भूगोलाची ओळख या पहिल्या प्रकरणात विषयाची माहिती होण्याच्या दृष्टीने मृदेचा अर्थ व व्याख्या, मृदा भूगोलाची संकल्पना, स्वरूप व व्याप्ती आणि मृदा अभ्यासाचे महत्त्व हे उपघटक विश्लेषित केले आहेत. मृदा निर्मिती आणि छेद या दुसऱ्या प्रकरणात मृदा निर्मितीवर परिणाम करणारे घटक, मृदेचे घटक स्पष्ट केले असून त्याचबरोबर मृदेचे थर आकृतीसह वर्णन केले आहेत. मृदा ऱ्हास आणि संवर्धन या तिसऱ्या प्रकरणात मृदा ऱ्हासच्या व्याख्या, प्रकार, कारणे व परिणाम लिहिले आहेत. याच प्रकरणात मृदा संवर्धनाची व्याख्या, गरज, पद्धती, मृदा संवर्धनामध्ये सुदूरसंवेदन आणि जीआयएसची भूमिका विश्लेषित केली आहे. \u003cbr\u003eपुस्तकामधील चार ते सात या प्रकरणात मृदा भूगोलातील प्रात्यक्षिके सोदाहरण स्पष्ट केली आहेत. मृदा नमुना संकलन या चौथ्या प्रकरणात प्रातिनिधिक मृदेचे नमुने संकलन करण्याची पद्धती आणि नमुना संकलित केल्यानंतर त्याबाबत घ्यावयाच्या क्षेत्रीय नोंदी आणि स्थळ परिस्थितीचे मुद्दे सोदाहरण दिले आहेत. मृद्कणांच्या आकाराचे विश्लेषण या पाचव्या प्रकरणात चाळणी व हायड्रोमीटर पद्धतीने मृदेचा \u003cbr\u003eपोत निश्चित करण्याची पद्धती आणि पोत त्रिकोण आलेखन आकृतीसह वर्णन केले आहे. मृदेची संरचना आणि सच्छिद्रता या सहाव्या प्रकरणात मृदा संरचनेचे प्रकार ओळखण्याचे तंत्र आणि मृदेची सच्छिद्रता निश्चिती करण्याची पद्धती सूत्राद्वारे विश्लेषित केली आहे. मृदेचा सामू आणि विद्युत वाहकता या शेवटच्या प्रकरणात मृदेच्या सामुचा अर्थ, महत्त्व, मोजण्याची पद्धती आणि मृदेच्या pH चे सुपीकता निर्देशांक वाचन करण्याची माहिती दिली आहे. याच प्रकरणात मृदेच्या विद्युत वाहकतेचा अर्थ, त्याचे महत्त्व, विद्युत वाहकता मोजण्याची मापनपद्धती आणि मृदेच्या विद्युत वाहकता निर्देशांकाचे वाचन करण्यासंबंधीचे विश्लेषण केले आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52906389045477,"sku":"9789377761585","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MrudaBhugol_Kudnar-1.jpg?v=1789811260","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87-soil-geography-and-practicals","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}