{"product_id":"युद्ध-आणि-शांती-1945-पासून-इतिहास","title":"युद्ध आणि शांती (1945 पासून इतिहास)","description":"\u003cp\u003eयुद्धप्रवृत्ती सर्व प्राणीमात्रात निसर्गतःच जोपासली गेली आहे. आदिमानवापासून आतापर्यंत उत्क्रांतीमुळे बदलत्या मानवी जीवनातील युद्धाचे स्थान कधीही ढळले नाही; महत्व कमी झालेले नाही. मानवी सभ्यता आणि संस्कृतीचा विकास युद्धाशी संबंधित आहे. समाजाचे अस्तित्व आणि विकास युद्धामुळेच नियंत्रित होत आहे. दुसर्या महायुद्धानंतर उदयास आलेल्या अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन्ही महाशक्तींनी आपआपले अस्तित्व जोपासण्याचा प्रयत्न केला. दोन्ही महाशक्तींमध्ये संघर्ष तेवत राहिला तरी त्याचे रूपांतर प्रत्यक्ष युद्धात न होता शीतयुद्धात झाले. जागतिक राजकारणात अनेक स्थित्यंतरे दुसर्या महायुद्धानंतर झालीत.\u003cbr\u003eमहायुद्धानंतर सर्व देशात जागतिक स्तरावर, आर्थिक, सामाजिक, राजकीय व लष्करीशक्तीची नवीन मांडणी पुढे आली. त्या परिस्थितीत स्थानिक संघर्षानेही जोम धरला. शीतयुद्ध समाप्तीच्या उंबरठ्यावर असताना राजकीय घडामोडींना गतीमानता आली. महासत्तेचे केंद्र असलेल्या आशियाई खंडातील चीन, रशिया, भारत, जपान याच बरोबर इराणचे सत्ता वर्चस्व वाढीस लागले.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात युद्ध संकल्पना, युद्धाची कारणे, युद्ध प्रकार, अणुयुद्ध, रासायनिक व जैविक युद्ध, जागतिक पुनर्रचनेची निर्मिती, शीत युद्ध, युद्ध आणि अर्थव्यवस्था, आधुनिक युद्ध सामरिकी, विविध करार, संघटना, सत्ता संतुलन, अलिप्ततावादी चळवळ वगैरे मुद्द्यांचा सर्वंकष विचारविमर्श केलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eYudha and Shanti\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468452049125,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Yudha-ani-Shantata_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1771938357","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80-1945-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}