{"product_id":"राजकीय-पत्रकारिता-2","title":"राजकीय पत्रकारिता","description":"\u003cp\u003eराजकीय पत्रकारितेचा परिचय हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती देतांना मला अतिशय आनंद होत आहे. क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तृतीय वर्ष कला NEP पॅटर्नच्या अंतर्गत विद्यार्थ्याच्या अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी Discipline Specific Elective हा नवीन पेपर सुरू करण्यात आलेला आहे. राज्यशास्त्र अभ्यासमंडळाने शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून Skill Enhancement Course साठी राजकीय पत्रकारितेचा परिचय हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे. विद्यापीठाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमाचा विचार करून प्रस्तुत पुस्तकाचे लेखन केलेले आहे तसेच महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात पत्रकारिता आणि जनसंचार संदर्भात समाविष्ट केलेल्या अभ्यासक्रमाचा विचार करून पुस्तकांची रचना केलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगात येईल.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात राजकीय पत्रकारिता विषयाशी निगडित सर्व संकल्पनाचा आढावा घेऊन सविस्तर माहिती दिलेली आहे. आवश्यक तेथे उदाहरणाचा समावेश केलेला आहे. पुस्तकात एकूण चार प्रकरणाचा समावेश आहे. प्रथम प्रकरणात राजकीय पत्रकारितेची ओळख आणि सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसऱ्या प्रकरणात राजकीय पत्रकारितेची मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, वेब आणि डिजिटल माध्यमांबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसऱ्या प्रकरणात राजकीय पत्रकारिते समोरील माध्यमांचे व्यावसायिकरण, सोशल मीडिया, राजकीय पक्ष प्रभावित वर्तमानपत्रे इत्यादी आव्हानांबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे. चौथ्या आणि अंतिम प्रकरणात राजकीय घटनेचे वार्तांकन, राजकीय मुलाखती, कायदेमंडळाचा वृत्तांत, राजकीय पत्रकारितेच्या पद्धतींची प्रासंगिकता इत्यादी प्रमुख घटकांचे विश्लेषण केलेले आहे. प्रस्तुत पुस्तक लेखनातून विद्यार्थी वर्गास राजकीय पत्रकारिता विषयातील प्रमुख संकल्पना समजण्यास हातभार लागेल तसेच अभ्यासू प्राध्यापक वर्गाला अध्यापन करताना संदर्भ ग्रंथ म्हणून पुस्तक उपयुक्त ठरेल. सदर पुस्तक लिहिताना पत्रकारिता, जनसंचार, राजकीय पत्रकारिता ह्या विषयावर तज्ञांनी लिहिलेल्या संदर्भ ग्रंथाचा आधार घेतलेला आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":51095153836261,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/RajkiyaPatrakarita_MahendraPatil-1.jpg?v=1785325361","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}