{"product_id":"लष्करी-विचारवंत","title":"लष्करी विचारवंत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राकृतिक घटकांच्या अनुषंगाने ठरविलेले संरक्षणविषयक धोरणक्षेत्र विचार म्हणजेच सैनिकी विचार होत. सैनिकी शक्ती, सुरक्षेच्या हमी किंवा संरक्षणाच्या योग्य व्यवस्थेशिवाय राष्ट्रीय अस्तित्व टिकू शकत नाही. त्याचा मूलभूत स्त्रोत म्हणजे आपले विचारवंत होत. विचारवंत हे अर्थशास्त्रज्ञ, राजनीतीज्ञ, समाजसेवक, भूगोलतज्ञ, उद्योगपती किंवा लढवैय्ये योद्धा असतील, त्या सर्वांच्या सारासार विचारसरणीतून देशाचे भवितव्य साकारते. देशाची प्रगती, स्थैर्य, शांतता व स्वातंत्र्य अबाधित राहते. प्रस्तुत लिखाणात पाश्चात्य विचारवंताबरोबर पौर्वात्य विचारवंतही विचारात घेतले आहेत. शिवाय सर्व प्रमुख महान भारतीयांची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रामुख्याने कौटिल्य, श्री छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, मोहनदास गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, वि.दा. सावरकर, पं. नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री, शहीद भगतसिंग, इंदिरा गांधी, श्री अटलबिहारी वाजपेयी, फील्ड मार्शल सॅम, माणेकशा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यासारख्या देशहितवादी विचारवंतांच्या विचाराचा समावेश असून जनरल सन्त्जू, मॅकियाव्हेली निक्कोलो, गुस्तावस एडाल्फ पासून तर कॅप्टन सादत आणि इसाकू साटो पर्यंतच्या पाश्चात्य विचारवंतांचाही समावेश केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474232553701,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Lashkari-Vicharvant-1.jpg?v=1772093976","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b2%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}