{"product_id":"लोकप्रशासनाची-मूलतत्त्वे-fundamentals-of-public-administration","title":"लोकप्रशासनाची मूलतत्त्वे - Fundamentals of Public Administration","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या TYBA साठी NEP अभ्यासक्रमानुसार तयार केलेले “लोकप्रशासनाची मूलतत्त्वे” हे पुस्तक तुमच्या हातात देताना मला आनंद होत आहे. लोकप्रशासन हा विषय लोकशाहीत नागरिक आणि शासन यांच्यातील नात्याचे भान देणारा एक महत्त्वाचा बौद्धिक प्रवास आहे. या पुस्तकाच्या पहिल्या विभागात लोकप्रशासनाचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती, विकास, लोकप्रकाशनाचे पारंपारिक व आधुनिक दृष्टीकोन तसेच नवलोकप्रशासन, सुशासन आणि ई-शासन या आधुनिक संकल्पना एकसंधपणे मांडल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थी केवळ तथ्ये नव्हे तर संपूर्ण विचारप्रवाह समजून घेऊ शकतील. सार्वजनिक धोरणाची संकल्पना, अर्थ आणि प्रकार यासोबतच धोरणनिर्मिती व अंमलबजावणी प्रक्रिया, धोरणाचा जनजीवनावर होणारा परिणाम आणि सुशासन साध्य करण्यासाठी ई-शासन का आवश्यक ठरते, याचा सविस्तर विचार केला आहे. तिसऱ्या विभागात भारतीय प्रशासकीय संरचनेचे चित्र उभे केले असून केंद्रीय, राज्य आणि जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्था (त्रिस्तरीय पंचायतराज व शहरी स्वशासन) यांचा परस्परसंबंध आणि त्यांच्या कामकाजाची रूपरेषा स्पष्ट केली आहे.चौथ्या विभागात केंद्रीय व राज्य नागरी सेवांची रचना, UPSC, MPSC, SSC अशा भरती संस्थांची भूमिका, नागरी सेवांचे कार्य आणि त्यांच्या कामकाजासमोरील सुधारणा व प्रमुख आव्हाने यांवर सुसंगत चर्चा करण्यात आली आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916731248869,"sku":"9789377761028","price":470.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/LokprashasanachiMultatve_wanarse-1.jpg?v=1789984221","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87-fundamentals-of-public-administration","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}