{"product_id":"लोकसंख्या-भूगोल-2","title":"लोकसंख्या भूगोल","description":"\u003cp\u003eनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मधील तरतूदींच्या अनुषंगाने आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आकृतीबंधानुसार व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अभ्यासक्रमानुसार तसेच महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या सुधारित अभ्यासक्रमाचा समावेश असलेले ‘लोकसंख्या भूगोल’ हे पुस्तक विद्यार्थी मित्र, अभ्यासक आणि प्राध्यापक बंधू-भगिनींच्या हाती सुपूर्द करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.\u003cbr\u003eसुजान वाचक मित्रहो, कोणत्याही देशाची लोकसंख्या ही त्या देशाच्या प्रगतीतील एक प्रेरक शक्ती असते किंबहुना ही त्या देशाची एक महत्त्वाची साधनसंपत्ती मानली जाते. परंतु आधुनिक काळात झालेली लोकसंख्या वाढ ही एक चिंतनाचा विषय ठरत आहे. कारण 21 व्या शतकात जगातील लोकसंख्या वाढीने विस्फोटक रूप धारण केले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय शोधणे हे लोकसंख्या भूगोलाचे महत्त्वाचे कार्य आहे. म्हणून लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करणे ही काळाची गरज बनली. या सर्व बाबींचा विचार करून आम्ही ‘लोकसंख्या भूगोल’ हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकामध्ये लोकसंख्या भूगोल ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी लोकसंख्या भूगोलाची व्याख्या, स्वरूप व व्याप्ती आणि लोकसंख्या सामग्रीचे प्रकार आणि स्त्रोत, लोकसंख्या घनता, घनतेचे प्रकार आणि लोकसंख्या सिद्धांत, भारताचे व जागतिक लोकसंख्या वितरण, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक, लोकसंख्येची संकल्पना आणि 2000 चे भारताचे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, जनन, मर्त्यता आणि स्थलांतर, लोकसंख्या रचना आणि वैशिष्टे – यात लिंगरचना, वयरचना, भारतातील लिंगरचना, वैवाहिक स्थिती, साक्षरता आणि 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील धार्मिक स्थिती इत्यादी घटकांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.\u003cbr\u003eविद्यार्थ्यांना व वाचकांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, अतिशय योग्य पद्धतीने विषयाचमी मांडणी, विषयाच्या मांडणीसाठी आवश्यक तेथे आकृत्या व नकाशे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून प्रस्तुत पुस्तक केवळ विद्यापीठ व महाविद्यालयीन अभ्यासक्रमापुरता मर्यादित न राहता भूगोलप्रेमी अभ्यासक, विद्यार्थी आणि सर्व सुजाण वाचक यांना उपयुक्त ठरेल यादृष्टीने प्रयत्न करण्यात आलेले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470337880293,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Loksankhya-Bhugol_Dr-Namdev-Gajre_cnvt-1.jpg?v=1772001780","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2-2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}