{"product_id":"लोकसंख्या-व-वस्ती-भूगोलाची-ओळख-प्रात्यक्षिकांसह-introduction-to-population-and-settlement-geography-with-practicals","title":"लोकसंख्या व वस्ती भूगोलाची ओळख प्रात्यक्षिकांसह (Introduction to Population and Settlement Geography with Practicals)","description":"\u003cp\u003eलोकसंख्या एक महत्त्वाची साधनसंपत्ती आहे तसेच अलीकडील काळात वाढत्या लोकसंख्येमुळे नगरांची वाढ होत आहे. ही बाब विचारात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यासमंडळाने लोकसंख्या व वस्ती भूगोल या विषयाचा पदवी स्तरावरावरील अभ्यासक्रमात समावेश केला आहे. भूगोल विषयाच्या विद्यार्थांना लोकसंख्या व वस्ती भूगोलाचे महत्त्व समजून देण्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील जाणकार, अभ्यासक, व्यावसायिक, संशोधक यांच्याशी सखोल चर्चा करून तसेच लोकसंख्या व वस्ती भूगोलाशी निगडीत संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती, वर्तमानपत्रातील लेख, अहवाल, चर्चासत्रे, परिषदा, शोध निबंध यांचा आधार घेऊन सदर पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे. लोकसंख्या व वस्ती भूगोलाचे स्वरूप व महत्त्व, लोकसंख्या विषयक संकल्पना, लोकसंख्या वाढ, लोकसंख्या वाढीचे घटक, अतिरिक्त लोकसंख्या, लोकसंख्याविषयक धोरणे, वस्त्यांच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, वस्ती भूगोलातील संकल्पना, ग्रामीण वस्त्यांचे प्रकार व कार्य, शहरी वस्तीविषयक संकल्पना, नागरीकरण व त्याच्याशी संबंधित समस्या तसेच प्रात्याक्षिकांमध्ये जनन, मर्त्यता व लोकसंख्येची घनता यांचे मापन, लोकसंख्या प्रक्षेपण, व त्यांचे मापन, गुरुत्वाकर्षण प्रतिमान, लॉरेन्झ वक्र, गिनी गुणांक व ग्रामीण वस्तीचे व्यष्टी अध्ययन यांचा अभ्यास या पुस्तकाच्या लिखाणात समाविष्ट करण्यात आला आहे.         \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48665793331429,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/LoksankyavaVastiBhugolachiOlakhPractical_Wani-1.jpg?v=1775112044","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a4%96-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%b9-introduction-to-population-and-settlement-geography-with-practicals","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}