{"product_id":"वनराई","title":"वनराई","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003e‘वनराई’ हा माझा आठवा काव्यसंग्रह आपल्या हाती देतांना मला विशेष आनंद होत आहे. माझ्या विनंतीस मान देऊन या काव्य संग्रहास साहित्य क्षेत्रातील भीष्माचार्य महान साहित्यिक श्री.वा. ना. आंधळे सरांची प्रस्तावना लाभली आहे. हे माझे परम भाग्य मी समजतो. \u003cbr\u003eसंपूर्ण महाराष्ट्रात गाजलेली कविता ‘आई मला जन्म घेऊ दे’ आतापर्यंत वेगवेगळ्या 45 भाषांमध्ये अनुवादित झालेली आहे. सर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विचारधारा प्रशाळेत ऍडवायझरी समिती सदस्य आहेत. तसेच सर मध्यप्रदेश मराठी अभ्यास मंडळात प्रमुख मार्गदर्शक सुध्दा आहेत. \u003cbr\u003eप्रा.वा.ना. आंधळे सरांच्या कवितांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथून व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून दोन संशोधक प्राध्यापकांनी पीएच.डी. केलीय. सर शालेय व विद्यापीठीय अभ्यास क्रमातील कवी आहेत. सरांनी काही मराठी मालिकांसाठी शिर्षक गीते सुध्दा लिहिली आहेत. \u003cbr\u003eसंपूर्ण महाराष्ट्रात त्यांना व्याख्यानांसाठी आमंत्रित केले जाते. एवढ्या धकाधकीत त्यांनी माझ्या कविता संग्रहास प्रस्तावना देऊन मला उपकृत केले.हा माझा सर्वोच्च सन्मान मी समजतो. आदरणीय श्री. आंधळे सरांचे आभार न मानता आजंन्म त्यांच्या ऋणांत राहू ईच्छितो. \u003cbr\u003eमाझा जन्मच मुळात लोणी, ता.जामनेर सारख्या खेडे गावात शेतकरी कुटुंबात झाला असल्यामुळे सहाजिकच शेताचा पिकांचा आणि गाई गुरांचा संबंध फार जवळून आलेला आहे. मातीशी जुळलेली नाळ आजतागायत टीकून आहे. आज सुध्दा शेती हाच माझा प्रमुख व्यवसाय आहे. बालपणीच्या असंख्य आठवणी मनात घर करून आहेत. \u003cbr\u003eप्राथमिक शाळेत असतांना शाळा सुटल्यावर किंवा सुटीच्या दिवशी शेतात जाणे, खळ्यात वासरांना पाणी पाजणे. सुटीत गूरे राखण्यासाठी, त्यांना चारण्यासाठी शेत बांधावर, माळरानावर घेऊन जाणे. आईला घरकामात संपूर्ण मदत करणे. हा माझा आवडता छंद होता. 1955 ते 1972 जुन्या मॅट्रिक 11 वी पर्यंतचा काळ लोणी सारख्या खेड्यात निसर्गात आनंदात गेला आणि विशेष म्हणजे इयत्ता आठवी पासून निसर्गरम्य कच्च्या रस्त्याने 5 की मी ये-जा फत्तेपूर पर्यंत पैदल \u003cbr\u003eप्रवास. रस्त्यात आडवी नदी. हे सर्व सांगायचे कारण म्हणजे सानिध्य निसर्ग निसर्ग आणि निसर्गच...!! \u003cbr\u003eसभोवतालच्या छोट्या मोठ्या गोष्टींचे अवलोकन, पक्षांचे आवाज, नदीतील वाळूत कुस्ती खेळणे. गवताचे बोरू तयार करणे व त्यानेच अक्षरे गिरवणे हे सर्वच आज स्वप्नवत वाटते. आजही एकटे निवांतपणे झाडाखाली बसले म्हणजे चित्त प्रसन्न होते.. चिंतन, मनन केल्यामुळे मन प्रसंन्न, आनंदी होते व सहजपणे कल्पना सुचतात. सहजपणे शब्द येतात. त्यांचे टीपण वेळीस करतो. घरात सुध्दा चिंतन, मनन, आणि एकाग्रता साधली म्हणजे शब्द सूचून कविता जन्माला येते. हा माझा स्वानुभव आहे. \u003cbr\u003eजास्त पावसामुळे खेड्यातील जीवन पूर्वी कष्टप्रद होते आज ती वस्तुस्थिती नाही. आज खेडे सुध्दा शहरा सोबत धावता आहेत. \u003cbr\u003eप्रगतीचा मार्ग आज खेडोपाडी गवसला आहे. गावागावात अभ्यासिका तयार झाल्या आहेत. खेड्यातील मुले मुली डॉक्टर इंजिनिअर तसेच स्पर्धा परीक्षेद्वारे अधिकारी होत आहेत. शिक्षणाची गंगा घरासमोरून वाहते आहे. त्याचाच प्रत्यय आज येत आहे.\u003cbr\u003eपावसाळ्यात सृष्टी हिरव्यागार सौंदर्याने अधिक श्रीमंत होते. नव्या नवरी सारखी सुंदर दिसते. त्यामुळेच मला भावते.. असे वनराई मध्ये म्हटले आहे.\u003cbr\u003eमाझ्या कवितेतून सर्वांना तृप्तीचा आनंद मिळत राहो. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद सर्वांनी घ्यावा. \u003cbr\u003eचुकीच्या ठिकाणी तोषेरे ओढले आहेत.सत्याची परिभाषा समजून घेतली जावी. सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार कवी लेखकांना नुसते मुक साक्षीदार होता येत नाही. सामाजिक बांधिलकी जपावी लागते.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67752042430693,"sku":"9789389493641","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vanrai_DnyaneshwarGhulee-1.jpg?v=1792412692","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%88","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}