{"product_id":"वाङ्मयीन-दृष्टी-आणि-दृष्टिकोन","title":"वाङ्मयीन दृष्टी आणि दृष्टिकोन","description":"\u003cp\u003eसर्जनशील साहित्यकृतींना लिहिलेल्या प्रस्तावनांच्या व्यतिरिक्त डॉ. किसन पाटील यांनी ‘दलित आत्मकथनांचा समाजशास्त्रीय अभ्यास’ या प्राचार्य शिवदास शिरसाठ यांच्या संशोधन ग्रंथाला लिहिलेली प्रस्तावना महत्त्वाची आहे. दलित आत्मकथनांचे श्रेष्ठत्व आणि निराळेपण यातून समोर येते. डॉ. सत्यजित साळवे यांनी लिहिलेल्या ‘खानदेशातील दलित जाणिवेची सम्यक कविता’ या समीक्षा ग्रंथाला डॉ. किसन पाटील यांनी विस्तृत प्रस्तावना लिहिलेली आहे. या प्रस्तावनेतून मराठीतील दलित जाणिवेच्या कवितेचा मागोवा घेण्याबरोबरच खानदेशातील दलित कवितेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केलेले आहे. ‘खानदेशची लोकसंस्कृती आणि लोकधारा’ या लोकवाङ्मयावर आधारित ग्रंथाला व ‘आदिवासी तडवी बोलीचा शब्दकोश’ या शब्दकोशालादेखील त्यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. डॉ. संदीप माळी यांच्या ‘खानदेश-विदर्भ-मध्यप्रदेशात सीमावर्ती भागातील लोकगीते: एक अभ्यास’ या विषयावर संशोधन केले. त्यांच्या संशोधन ग्रंथाला डॉ. किसन पाटील यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिलेली आहे. यातून त्यांनी नवसंशोधकांनी लोकसाहित्याचा अभ्यास कोणकोणत्या नव्या दृष्टिकोन आणि पद्धतींचा अवलंब करून केला पाहिजे. याविषयीचे विवेचन केले आहे. संशोधन ग्रंथातून अभ्यासकाने मांडलेली मते आणि लोकगीतांचे विश्लेषण याचे त्यांनी कौतुक केलेले आहे. या सर्व प्रस्तावनांमधून त्या-त्या लेखक आणि अभ्यासकाचे लेखन आणि भूमिका याचे महत्त्व आणि वेगळेपण मांडलेले दिसते.\u003cbr\u003eडॉ. किसन पाटील यांनी विविध साहित्यकृती आणि ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावना एकत्र करून त्याचे संपादन करण्याची आमची मनीषा या ग्रंथाने मूर्त रूपात साकार होते आहे याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. ह्या प्रस्तावना त्या-त्या साहित्यकृती समजून घेण्यास उपयुक्त आहेत. याबरोबरच ह्या प्रस्तावना खान्देशातील समकालीन साहित्य आणि त्याची वाटचाल याचे आकलन होण्यास सहाय्यभूत ठरतील अशा आहेत. डॉ. किसन पाटील यांची साहित्याकलनाची दृष्टी आणि भूमिका याचे अवलोकनदेखील यामुळे होईल.          \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48874743988453,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/WadamyinDushtiAaniDushtikon_DrYogeshMahale-1.jpg?v=1776759619","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%99%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%a6%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a6%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}