{"product_id":"विवाह-उत्तरार्ध-जाती-जमाती-vivah-uttaradha-jati-jamati","title":"विवाह (उत्तरार्ध - जाती-जमाती) - Vivah (Uttaradha - Jati-Jamati)","description":"\u003cp\u003eभारतीय संस्कृतीच्या सोळा संस्कारापैकी विवाह हा एक महत्वाचा संस्कार आहे. प्राचीन काळातील विवाहपध्दती आणि अलिकडच्या विवाह पध्दतीमध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. वरकरणी सर्व पध्दती सारख्या दिसत असल्यातरी त्यामागची भावना, त्याग, स्नेह, आपुलकी आणि सामाजिक स्थिती बदलली आहे. विवाह अलिकडे खर्चाने, आकाराने, मेजवानी इत्यादी अनेक अंगांनी विस्तारीत झाला असला तरी त्याला विवाह संस्कार न संबोधता विवाह समारंभच म्हणावा लागेल. \u003cbr\u003eआपल्या मानवी समाजात अनेक प्रकारच्या जनजाती असून त्यांचा आपला मानवीनाते संबंध आहे. काही लोक शेती मजूर म्हणून, काही घरातील कामगार म्हणून, काही व्यवसायातील सेवक म्हणून आपलेशी जोडले गेले आहेत. त्या निरनिराळ्या जाती-जमातीच्या सुख-दुःख प्रसंगी आपण उपस्थिती देतो. प्रामुख्याने त्यांच्या आनंदाच्या विवाहाच्या प्रसंगी उपस्थित असताना त्यांचे कडील चालीरिती आपणास माहिती नसतात; त्यांच्या विवाह पध्दती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी निरनिराळ्या जाती जमाती अदिवासी लोकाकडील विवाह पध्दती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या अनेक ग्रंथातील संकलन करताना त्यात काही ठराविक लोकांचा समावेश केलेला आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":49462146433253,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vivah_Uttarardha__A.P.Chaudhari-1.jpg?v=1780302409","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80-vivah-uttaradha-jati-jamati","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}