{"product_id":"व्यावसायिक-कौशल्ये-professional-skills","title":"व्यावसायिक कौशल्ये  (Professional Skills)","description":"\u003cp\u003eप्रकाशन व्यवसाय आणि सृजनशील लेखन या दोन घटकांवर हा अभ्यासक्रम आधारलेला असून भाषासाहित्याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ही दोन्ही घटके केवळ अभ्यासच नव्हे तर, व्यावसायिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी उपयोगाची आहे. लेखक, वाचक, साहित्य चळवळ आणि ग्रंथप्रसारांमध्ये प्रकाशन व्यवसायाने भरीव योगदान दिलेले आहे. ज्ञान आणि अभ्यासाच्या क्षेत्रात प्रकाशन व्यवहार नसता तर, मानवी ज्ञान हे संकुचित वर्तुळात बंदिस्त असते. ज्ञानाचा व्यापक अवकाश निर्माण करण्यामध्ये प्रकाशन व्यवसायाने मोलाची भूमिका बजावलेली आहे. आज हा व्यवहार व्यवसाय म्हणून व्यापक झालेला आहे. माध्यम मुद्रित असो किंवा डिजिटल पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या वृद्धिंगत होत आहे. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये भाषाभ्यासाच्या माध्यमातून व्यवसायाची बीजे रूजली जावी आणि या कौशल्यावर आधारीत रोजगार त्यांना प्राप्त व्हावा याकरीता प्रकाशन व्यवहाराचे मूलतंत्र सदर पुस्तकात सविस्तरपणे मांडलेले आहे. किंबहुना प्रकाशन व्यवसायाची बाराखडीच येथे मांडलेली आहे.\u003cbr\u003eआजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रसारमाध्यमांचा स्फोट झालेला असून सातत्याने नाविन्याचा शोध घेण्याची वृत्ती लोकांमध्ये वाढलेली आहे. लोकांच्या या उत्सुकतेचे क्षमण करण्याची क्षमता ही सृजनशील लेखन करणारा व्यक्तीच करू शकतो. सृजनशील लेखन म्हणजे नाविन्यपूर्ण लेखन. हे लेखन फक्त व्यक्तीच निर्माण करू शकतो. कल्पनाविलास आणि विचारशक्ती असली की सृजनशील लेखन जन्माला येते. विविध प्रसारमाध्यमांमध्ये सृजनशील लेखन करणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे म्हणून मग, सृजनशील लेखनाची मूलतत्त्वे नेमकी कशी आहेत याचा ऊहापोह या पुस्तकात करण्यात आलेला आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67647662620901,"sku":"9789377762155","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavsayikkaushalye_Ghorpade-1.jpg?v=1791628211","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a5%8c%e0%a4%b6%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-professional-skills","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}