{"product_id":"शाश्वत-ग्रामीण-विकास","title":"शाश्वत ग्रामीण विकास","description":"\u003cp\u003eपंचायत राज व्यवस्थेचा मुळाचा शोध झाल्यास भारतात अगदी प्राचीन काळापासून पंचायती अस्तित्वात असल्याचे दिसून आले. ‘अनेक लहानमोठया खेडयांनी मिळून बनलेला देश’ अशी भारताची जुन्या काळापासून ओळख होती. या खेडयाचा कारभार स्थानिक लोकांमार्फत ‘ग्रामपंचायती’या संस्थेव्दारे चालविला जात होता. महात्मा गांधीनी स्वातंत्र संग्रामाच्या काळात खेडयाकडे जाण्याचा मार्ग दाखविला आणि ग्राम स्वराज्याची कल्पना मांडली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतात स्थानिय प्रशासनाच्या दिशेने नवीन प्रयत्न सुरू झाले. पंचायतीला खर्या अर्थाने यशस्वी बनवायचे असेल तर त्यामध्ये स्त्रियांच्या भूमिकेला नाकारता येत नाही. जर लोकांना जागृत करायचे असेल तर सर्वप्रथम स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करावी लागेल. एकदा जर स्त्रियां समोर आल्या तर संपूर्ण ते कुटुंब विकसीत होते. परिणामी देशाचासुद्धा विकास होतो. 1959 मध्ये बलवंतराय समितीने सुध्दा महिलांच्या प्रतिनिधीत्वाची व्यवस्था केली. 73 व्या घटना दुरूस्तीनंतर पंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांसाठी 1\/3 आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली. अनुसुचित जाती जमातीमध्ये स्त्रियांना सुध्दा आरक्षण देण्यात आले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eShasvat Gramin Vikas\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48460519440613,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shasvat-Gramin-Vikas_Ghuble_cnvt-1.jpg?v=1771917045","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a3-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}