{"product_id":"शिक्षणातील-नाट्य-आणि-कला","title":"शिक्षणातील नाट्य आणि कला","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवी मनातील विविध भावनांचे प्रकटीकरण, त्याला जाणवणाऱ्या सौंदर्यानुभूतिचे माध्यम म्हणजे कला. या विविध प्रकारच्या आहेत. नाटक ही देखील एक कला आहे प्राचीन काळापासून मानवाच्या विविध कलांशी संबंध आहे. या विविध कलांचा विकास मानवाच्या कर्तृत्वाची साक्ष देणारा आहे. प्राचीन काळापासून चौसष्ट कलांचा उल्लेख केलेला दिसतो. आज आधुनिक काळात या कलांमध्ये वाढच झालेली दिसते. विविध कलाप्रकार जगाच्या पाठीवर अस्तित्वात आहेत त्यातच सरमिसळ करून त्यांच्यावर प्रयोग करून कलाकारांनी त्यात नवनिर्मिती केलेली आहे. सर्व कलांच्या परिचय प्रस्तुत पुस्तकात देणे शक्य नाही तरी प्रमुख कलांचा थोडक्यात परिचय दिलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशिक्षकाला आपल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या अभ्यासक्रमाच्या गाभा घटकांपैकी एक प्रमुख घटक म्हणून त्याचा समावेश आहे. आज विज्ञानयुगात आपण राहत असलो तरी कलेपासून मानव दूर गेलेला नाही. उलट कलांना उजाळा देण्याचे नवनवीन रूप देण्याचे कार्य सुरू आहे. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विविध कला-नाट्य याद्वारे विविध विषयांचे प्रभावी अध्यापन शिक्षक करू शकतो. तसेच प्रत्येक विषयाच्या अध्यापनात नाट्याचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेला चालना देऊ शकतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48414467260645,"sku":null,"price":155.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shikshanatil-Natya-Aani-Kala-II_cnvt-1-198x300.jpg?v=1771064642","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}