{"product_id":"शैक्षणिक-मानसशास्त्र","title":"शैक्षणिक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eशैक्षणिक मानसशास्त्र हा संदर्भग्रंथ महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील बी.एड् पदवीच्या अभ्यासक्रमाचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तसेच डी.टी.एड्, एम.एड्, एम.एस्.डब्ल्यू. (चडथ), मानसशास्त्र, समाजशास्त्र, बालकल्याण विभाग, बी.एड् पूर्व परीक्षा अभियोग्यता चाचणी (ढअढ), सर्व विषयाच्या सेट आणि नेट परीक्षेच्या पहिल्या पेपरसाठी तसेच हा विषय अध्यापन करणाऱ्या सर्व क्षेत्रातील शिक्षकांना व अभ्यासकांना या संदर्भग्रंथाचा उपयोग होईल अशी अपेक्षा आहे.\u003cbr\u003eशैक्षणिक मानसशास्त्र या संदर्भग्रंथाचा उपयोग अध्ययनार्थी व अध्यापक यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. शैक्षणिक मानसशास्त्र या संदर्भग्रंथाचे लेखन करताना मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, पद्धती, तत्त्वे यांचा प्रत्यक्ष वापर कसा करावयाचा याचे उपयोजन अत्यंत सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच बालकांच्या विकास अवस्था व त्यावर परिणाम करणारे घटक, व्यक्तिभेद निर्माण होण्याची कारणे-उपाय, अध्यापनाची परिणामकारकता, विशेष शिक्षण घेणारी मुले, व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, सृजनशीलता, विचार, कल्पना, संकल्पना व समस्या निराकरण, ज्ञानरचनावाद, संकल्पना चित्रण व मनोचित्रण याचा प्रत्यक्ष अध्ययन अध्यापनात वापर, मेंदू आधारित अध्ययन, प्रश्नावलीच्या साह्याने उजव्या व डाव्या मेंदूचे प्राबल्य ओळखणे, ताण व्यवस्थापन, अध्ययनार्थीची विविधता, राजकीय सामाजिक व सांस्कृतिक मितींचे बालकावर होणारे परिणाम आणि त्यांना प्रत्यक्ष दैनंदिन जीवन जगत असताना होणारा उपयोग अत्यंत मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468463714533,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shaikshanik-Manasshastra_Prof-V-B-Adsare_cnvt-1.jpg?v=1771939353","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b6%e0%a5%88%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}