{"product_id":"शैक्षणिक-माहिती-तंत्रविज्ञान","title":"शैक्षणिक माहिती तंत्रविज्ञान","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविज्ञानात होत चाललेली प्रगती, ज्ञान क्षेत्रात होत असलेली वाढ, शिक्षण क्षेत्रात नवनव्याने प्रवेश करणारे मानवसमूह, लोकसंख्येत होत असलेली प्रचंड वाढ यांचा परिणाम शिक्षणावर फार मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेला आहे. शिक्षण हे सर्वांसाठी आहे. शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची जबाबदारीही खूपच वाढली आहे. मर्यादित मानवसमूहाला शिक्षण देण्यासाठी निर्माण झालेली शिक्षण पद्धती, विविध तंत्रे, साधने आता निष्प्रभ ठरू लागली आहेत. परंतु ही साधने, तंत्रे किंवा पद्धतींचे उच्चाटन करावयाचे तर नवीन पद्धती, साधने, तंत्रे विकसित व्हायला हवीत. शिक्षणक्षेत्रात निर्माण झालेल्या व होत असलेल्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी विचारवंत प्रयत्नशील आहेत. शिक्षणाच्या हेतूपासून ते थेट वर्गाध्यापनापर्यंत नव्याने मांडणी करण्याचा प्रयत्न होत आहे. केवळ ज्ञानासाठी ज्ञान ही संकल्पना थोडीशी बाजूला पडून मानवसमूहाच्या विकासासाठी शिक्षण्ा ही संकल्पना दृढ होऊ पाहते आहे. शैक्षणिक तंत्रविज्ञानाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने शैक्षणिक तंत्रविज्ञानाशी निगडित होऊ पाहाते आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477834379493,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shaikshanik-Mahiti-Tantravidnyan_Dr-H-N-Jagtap_cnvt-1.jpg?v=1772191528","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b6%e0%a5%88%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}