{"product_id":"संक्षिप्त-मध्ययुगीन-मराठी-वाङ्मयाचा-इतिहास","title":"संक्षिप्त मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास","description":"\u003cp\u003eमध्ययुगीन कालखंडात मराठी वाङ्मय हे वेगवेगळ्या रूपांत अवतरलेले दिसते. या काळात मराठी वाङ्मयनिर्मितीला सुरुवात झाली. मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ व पहिला पद्यग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’ यांची याच काळात रचना झाली. महानुभाव संप्रदाय व वारकरी संप्रदाय या दोन महत्त्वाच्या संप्रदायांचा उगमही याच काळात झाला. महाराष्ट्राचे सामाजिक-सांस्कृतिक जीवन या संप्रदायांनी समृद्ध केले आहे. त्यातून समाजात मानवी जीवनमूल्ये रुजली. शाहिरी वाङ्मय हा संत-पंत वाङ्मय प्रवाहांपेक्षा एक वेगळाच वाङ्मयप्रवाह मध्ययुगात जन्माला आला. बखर वाङ्मयाने इतिहास आणि वाङ्मय यांचे अनोखे नाते निर्माण केले. महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय, वारकरी संप्रदायाचे वाङ्मय, पंडिती वाङ्मय, शाहिरी वाङ्मय व बखर वाङ्मय अशी विविध प्रकारची वाङ्मयनिर्मिती या कालखंडात विपुल प्रमाणात झाली.प्रस्तुत पुस्तकात महानुभाव संप्रदायाचे गद्य-पद्य वाङ्मय, वारकरी संप्रदायाचे पद्य वाङ्मय, शाहिरी वाङ्मय व बखर वाङ्मय यासोबतच या वाङ्मय प्रवाहांमधील काही निवडक ग्रंथकार व काही निवडक साहित्यकृती तसेच महत्त्वाचे ग्रंथकार व त्यांच्या साहित्यकृती, ग्रंथकाराचे लौकिक जीवन व वाङ्मयीन कर्तृत्व यांचा विस्ताराने परामर्श घेतला आहे. प्रस्तुत पुस्तक हे वाचकांना व अभ्यासकांना वाङ्मयेतिहासाच्या अभ्यासासाठी निश्चितच लाभदायक ठरेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458232627429,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MadhyayuginMarathiVangmayachaItihas_AtulDeshmukh-1.jpg?v=1775476569","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%99%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}