{"product_id":"संरक्षण-व-सामरिकशास्त्र-मुलभूत-संकल्पना-आणि-भारत","title":"संरक्षण व सामरिकशास्त्र : मुलभूत संकल्पना आणि भारत","description":"\u003cp\u003eसंरक्षण या विषयाचा विचार करताना, मानवाला संरक्षण ही संकल्पना कधी व का सुचली असावी, असा प्रश्न पडतो. त्याच्या आदिम किंवा प्राथमिक अवस्थेत स्वसंरक्षणासाठी त्यास निसर्गाशी व जंगली श्वापदांशी सतत झगडावे लागत असे. कालांतराने तो प्रगत झाला. मानव प्राणी मनुष्य या संज्ञेला जेव्हापासून पात्र झाला व मानव संस्कृतीचाही विकास झाला तेव्हापासून तो संरक्षणाचा अधिक विचार करू लागला. त्यामधून संरक्षण या संकल्पनेचा विकास झाला. आज तर मानव व मानवी संस्कृतीचा खूपच विकास झालेला आहे. त्याच्या वैज्ञानिक संशोधनातून त्याने प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. परंतु संरक्षणाचे विचार त्याच्या मनाने आजही हद्दपार तर केले नाहीतच, उलट तो संरक्षणाच्या तरतुदींमध्ये अधिकाधिक गुंतत चालला आहे. स्वसंरक्षणासाठी त्यास पर्यावरण संरक्षण व पर्यावरण संतुलन देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पर्यावरण संरक्षण हे मानवी संसरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याच दृष्टिकोनातून संरक्षण संकल्पनेचा परीघ विस्तृत झाला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘संरक्षण व सामरिकशास्त्र : मूलभूत संकल्पना आणि भारत’ हा नाविण्यपुर्ण माहितीने नटलेला ग्रंथ आपल्याकडे सोपवताना अतिशय आनंद होत आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर वर्गातील संरक्षण व सामरिकशास्त्र, राज्यशास्त्र, तसेच नेट व सेट राज्यशास्त्र, संरक्षण व सामरिकशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त पडेल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477767041253,"sku":null,"price":695.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanrkshan-and-Samarikshastra_cnvt-1.jpg?v=1772189794","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}