{"product_id":"संशोधन-पद्धती-व-संशोधन-प्रकाशनाची-नीतितत्त्वे","title":"संशोधन पद्धती व संशोधन प्रकाशनाची नीतितत्त्वे","description":"\u003cp\u003eयुजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व पीएच.डी. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना प्री पीएच.डी. परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानुसार पेपर पहिला या करिता विद्यापीठामार्फत सुधारित नवीन अभ्यासक्रम सन 2021 पासून लागू केलेला आहे. त्या अभ्यासक्रमात संशोधन पद्धती आणि संशोधन प्रकाशनाची नीतितत्त्वे या दोन भागाचा समावेश आहे. सदर पुस्तक आम्ही पेपर पहिला याकरिता विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरावे असे तयार करण्याचा एक प्रयत्न केला आहे. पुस्तकात संशोधनातील गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या संकल्पना सोप्या व सहज भाषेत मांडण्यात आल्या आहेत. तसेच नवीन संकल्पना विषयी थोडक्यात अर्थपूर्ण विवेचन करण्यात आले आहे. अभ्यासक्रमनिहाय व मुद्देसुद मांडणी करण्यात आली आहे. संशोधक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील आशय घटकावर दिशादर्शक काही मुद्दे सदर पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत ते आपल्या परीक्षा तसेच पुढील संशोधन विषयक वाटचालीत\u003cbr\u003eउपयोगाचे ठरतील यात शंका नाही. संशोधन हा विषय व्यापक असून त्यावर जेवढे वाचन कराल तेवढे थोडे आहे. सदर पुस्तकाच्या माध्यमातून संशोधनविषयक संशोधन नीतितत्त्वे या भागातील नवीन वाटणाऱ्या संकल्पना आणि संबोध सोप्या व सहज भाषेत लिहिलेले आहेत जेणे करून सर्वांना त्या समजतील. काही ठिकाणी केवळ मुद्दे तर आवश्यक त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेले आहे. संशोधन हा विषय तसे पहाता खूप व्यापक आहे. संपूर्ण संशोधनाचा संपूर्ण अभ्यास हा या छोट्याश्या पुस्तकातून पूर्ण करणे शक्य नसले तरीही परिक्षेस उपयुक्त घटक व त्यावर आधारित संकल्पना समजण्याकरिता हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल. पुस्तकात लेखन करताना थोडक्यात व उपयुक्त असे केले आहे. संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनातील संकल्पना आणि नीतितत्त्वे लक्षात आणून देऊन त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नपेढी तयार करून दिली आहे.               \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48832401473765,"sku":null,"price":190.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SanshodhanPaddhatiPrakashan_DrSantoshKharade-1_99dbbcc0-7d4d-4c6c-ae2a-b6f4fb339fda.jpg?v=1776495244","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}