{"product_id":"समकालीन-राजकीय-विचारप्रणाली","title":"समकालीन राजकीय विचारप्रणाली","description":"\u003cp\u003e‘समकालीन राजकीय विचारप्रणाली’ हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती देताना मला अतिशय आनंद होत आहे. या पुस्तकाची रचना करताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार तृतीय वर्ष कला वर्गाच्या DSE या राज्यशास्त्र विषयाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अभ्यासक्रमाचा आणि महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांत शिकविला जाणारा आधुनिक राजकीय विचारप्रणाली हा विषय, तसेच नेट\/सेट, MPSC आणि UPSC अभ्यासक्रमांचा विचार केलेला आहे. त्यामुळे हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांत आणि स्पर्धा परीक्षांसाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयोगात येईल. \u003cbr\u003eया पुस्तकात ‘समकालीन राजकीय विचारप्रणाली’ या विषयाशी निगडित सर्व प्रमुख विचारप्रणालीचा आढावा घेतलेला आहे. पुस्तकात एकूण चार प्रकरणांचा समावेश आहे. प्रथम प्रकरणात विचारप्रणालींशी निगडित संज्ञा, संकल्पना आणि सिद्धान्ताची मांडणी केलेली आहे. दुसऱ्या प्रकरणात उदारमतवाद आणि लोकशाही समाजवाद या विचारप्रणालीचा अर्थ स्वरूप, प्रकार आणि मूल्यमापनाची चर्चा केलेली आहे. तिसऱ्या प्रकरणात मार्क्सवाद आणि मूलगामी विचारसरणी नव-मार्क्सवादाशी संबंधित विविध सिद्धांत आणि मर्यादांचे विश्लेषण केलेले आहे. शेवटच्या अंतिम व चौथ्या प्रकरणात डिजिटल स्वातंत्र्यवाद, तांत्रिक आशावाद, नव-राष्ट्रवाद, पर्यावरणवाद आणि बहुसंस्कृतीवाद या आधुनिक काळातील विचारप्रणालीशी संबंधित विविध मुद्द्यांचा उहापोह केलेला आहे. जागतिक राजकारणात विचारप्रणालीची प्रासंगिकता बद्दल देखील परामर्श घेतलेला दिसून येतो. पुस्तकात समाविष्ट संकल्पनांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे आणि विद्यार्थ्यांना आकलन व्हावे म्हणून उदाहरणांचादेखील समावेश केलेला आहे. \u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तक लेखनातून विद्यार्थी वर्गास समकालीन राजकीय विचारप्रणाली समजण्यास हातभार लागेल, तसेच अभ्यासू प्राध्यापक वर्गाला अध्यापन करताना संदर्भग्रंथ म्हणून पुस्तक उपयुक्त ठरेल. सदर पुस्तक लिहिताना आधुनिक राजकीय विचारप्रणाली आणि राजकीय सिद्धान्त या विषयांवर तज्ज्ञांनी लिहिलेल्या संदर्भग्रंथांचा आधार घेतलेला आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":51096243765477,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SamkalinRajakiyaVicharpranali_MahendraPatil-1.jpg?v=1785326096","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}