{"product_id":"साताऱ्याच्या-छत्रपतींच्या-राजदरबारातील-सांस्कृतिक-जीवन","title":"साताऱ्याच्या छत्रपतींच्या राजदरबारातील सांस्कृतिक जीवन","description":"\u003cp\u003eप्रस्तुत ग्रंथाद्वारे साताऱ्याच्या छत्रपतींच्या राजदरबारातील सांस्कृतिक जीवनावर नव्याने प्रकाश टाकलेला दिसून येतो. साताऱ्याच्या छत्रपतींचा राजदरबारातील सांस्कृतिक जीवनाचे विविध पैलू वाचकासमोर मांडलेले दिसून येतात. साताऱ्याच्या छत्रपतीनी (राजांनी) त्यांच्या दरबारात अनेक कलाकार, खेळाडु, सेवक व वैद्यक लोकांना राजाश्रय देवून आपल्या दरबाराचे महत्त्व वाढविले होते यात शंकाच नाही. त्यांच्या दरबारातील रितीरिवाज, करमणुकीचे कार्यक्रम, इतर चालीरिती, तत्कालीन सण आणि उत्सव, राजदरबारात साजरे होणारे धार्मिक विधी आणि राजदरबारातील वेगवेगळे विभाग यांचाही शोधपूर्ण आढावा घेतलेला दिसून येतो. ग्रंथात केलेले वर्णन अतिशय वास्तववादी स्वरुपाचे असून ते आजच्या काळातील महाराष्ट्रातील धार्मिक विधी व उत्सवांच्या वर्णनाशी बरेचसे जुळते मिळते आहे. त्यामुळे सदरील संशोधनात्मक ग्रंथ आजही महाराष्ट्राच्या समाजजीवनाशी निगडीत असल्यासारखा वाटतो. साताऱ्याच्या राजदरबाराच्या सांस्कृतिक जीवनात तत्कालीन मराठा स्त्रियांचा फार मोठा सहभाग होता. हे तत्कालीन साधन ग्रंथाच्या पुराव्यावरुन म्हणता येईल. मराठ्यांच्या सांस्कृतिक जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक ग्रंथापैकी हा एक अतिशय मौल्यवान ग्रंथ असून या ग्रंथाव्दारे मराठ्यांच्या इतिहासात नव्याने भर पडेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eSataryachya Chhatrapatinchya Rajadarbaratil Sanskrutik Jeevan\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479786402021,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sataryachya-Chhatrapatinchya_Dr-Ramesh-D-Jadhav_cnvt-1.jpg?v=1772265712","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}