{"product_id":"सामाजिक-मानवशास्त्र","title":"सामाजिक मानवशास्त्र","description":"\u003cp\u003eआधुनिक सामाजिक शास्त्रात एक अतिशय महत्वपूर्ण शास्त्र म्हणजे मानवशास्त्र होय. मानवाचे अध्ययन करणार्या वेगवेगळ्या शाखा आहे. त्या सर्व शाखांना एकत्र करण्याची आवश्यकता 1859 साली फ्रेंच विचारवंत श्री. पॉल ब्रोका यांनी मांडली आणि पुढे सामान्य मानवशास्त्राचा उदय झाला. मानवशास्त्रात मानवाच्या शारीरिक, सांस्कृतिक व सामाजिक या तिन्ही अंगाचा अभ्यास केल्या जातो. त्यादृष्टीने मानवशास्त्र हे विविध प्रकारच्या शास्त्राशी निगडीत असून एक सामाजिक शास्त्र म्हणून मानले जाते. सामाजिक मानवशास्त्र हे विज्ञान आहे. त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीनेच समाजाचा अभ्यास या शास्त्रात केला जातो. इ.स. 1870 पासून सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली. वर्तमानकाळात सामाजिक मानवशास्त्रात आदिवासी व ग्रामीण समाजाचा अभ्यास केला जातो. परंतु आदिवासी समाजाच्या अभ्यासावर प्रकर्षाने लक्ष दिले जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानवशास्त्र मानवाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने अध्ययन करीत असल्यामुळे त्यात मानवी जीवनाच्या सर्व अंगाचा अभ्यास केल्या जातो. मानवशास्त्र एका व्यक्तीचे अध्ययन करीत नसून मानवी समुहाचे अध्ययन करते म्हणून मानवी समाजाअंतर्गत असलेल्या विविध गटाचा मानवशास्त्र अभ्यास करते. मानवशास्त्र हे आदीम व प्रगत अश्या दोन्ही समाजाचे अध्ययन करते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकात सामाजिक मानवशास्त्राचा परिचय, सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासपद्धती, भारतातील आदिवासी समाज, आदिवासी धर्म व जादू, आदिवासींची अर्थव्यवस्था, आदिवासींचे सामाजिक जीवन, कुटुंब, देवकवाद, आदिवासी समस्या व विकास इ. मुद्द्यांचा सविस्तरपणे उहापोह केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477818880229,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajik-Manavshastra_Dr-Sudha-Khadke_cnvt-1.jpg?v=1772191403","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}