{"product_id":"सार्वजनिक-आयव्ययाचे-अर्थशास्त्र","title":"सार्वजनिक आयव्ययाचे अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003eसार्वजनिक आयव्यय हा राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन अभ्यास विषयांच्या सीमेवर असलेला विषय आहे. त्याचा एक पाय राज्यशास्त्राच्या दगडावर तर दुसरा पाय अर्थशास्त्राच्या दगडावर आहे. राज्यशास्त्र राज्यकारभार कसा चालवायचा हे सांगते तर राज्यकारभारातून समाजकल्याणात वाढ कशी करायची आणि त्यासाठी उत्पन्न कसे प्राप्त करायचे व ते कसे खर्च करायचे हे सांगते. सरकार कर आणि करेत्तर मार्गाने उत्पन्न प्राप्त करते. कर हे सक्तीचे अंशदान असते. त्याच्या बदल्यात करदात्याला कोणताही विशेष लाभ मिळत नाही. कर महसूल प्राप्त करण्याचे एक साधन आहे. याबरोबरच ते आर्थिक विषमता कमी करण्याचे प्रमुख साधन आहे. आधुनिक काळात कल्याणकारी राज्य संकल्पना स्विकारण्यात आली आहे. जनकल्याणासाठी सरकारला खर्च करावा लागतो आणि तो भागविण्यासाठी सरकारला महसूल प्राप्त करावा लागतो. खर्च आणि महसूल ताळमेळ बसत नसेल तर सार्वजनिक कर्ज, तुटीचा अर्थभरणा यांचा अवलंब करावा लागतो.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आयव्ययाची भूमिका\/महत्त्व, आयव्ययाचे सिद्धांत, कर, सार्वजनिक वस्तू आणि खासगी वस्तू, कराघात, करभार आणि करभाराचे संक्रमण, बाजाराचे अपयश आणि सरकारचा हस्तक्षेप, सार्वजनिक खर्च, भारतातील सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती, सार्वजनिक कर्जाचे व्यवस्थापन आणि सार्वजनिक कर्जाची परतफेड, अंदाजपत्रक आणि तुटीचा अर्थभरणा, विकसनशील अर्थव्यवस्थेत तुटीच्या अर्थभरणाची भूमिका इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश आहे. प्रस्तुत पुस्तक सर्वांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eSarvajnik Ayavyayvache Arthashastra\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48457987752165,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sarvakamol-Ayavyayache-Arthashastra_Dr-Manoj-Gaikawad-1.jpg?v=1771832374","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}