{"product_id":"सार्वजनिक-प्रशासन-आणि-व्यवस्थापन-भाग-2","title":"सार्वजनिक प्रशासन आणि व्यवस्थापन (भाग 2) (Public Administration and Management)","description":"\u003cp\u003eव्यवस्थापन हा एक विचार म्हणून अलिकडे अनेक विद्याशाखेत परिचित आहे. व्यवस्थापनासंबंधी सूक्ष्मत्वाने अध्ययन केल्यास व्यवस्थापन, प्रशासन, संघटन या तीन संकल्पनेचा परस्पर संबंध विचारात घ्यावा लागतो. अलिकडे सार्वजनिक हिताची कार्ये प्रशासनाद्वारे संपन्न केली जातात. अर्थात तो शासकीय कर्तव्याचा एक भाग असतो. सर्व नागरिकांना एकसमान वर्तवणूक प्राप्त होणे हे समाधानकारक सेवेचे एक लक्षण मानले जाते. आधुनिक भारतात पाश्चात्य विचारांच्या प्रभावामुळे स्वार्थी जीवनामुळे आपल्या देशातील सनदी सेवकांची नैतिक घसरण होत आहे. अनेक स्वरूपाच्या प्रशासकीय भ्रष्टाचारामुळे प्रशासकीय अधिकारी, राजकीय अधिकारी या दोघांचेही हात भ्रष्टाचारात गुंतलेले दिसतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत ग्रंथात व्यवस्थापन संकल्पनेची विस्तृत माहिती, व्यवस्थापनाची आवश्यकता ही आजच्या परिप्रेक्ष्यात विश्लेषीत करण्याचा प्रयत्न केला आहे. आद्योगिक-सामाजिक प्रशासकीय नेतृत्वाचा भूमिकेतून संघटनेचा हेतू कसे साध्य केले जाते, नेतृत्वाची संकल्पना, नेतृत्व घटक, आवश्यक योग्यता या बाबी सूक्ष्मत्वाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याचप्रमाणे राजकीय कार्यकारी भूमिकेचा एक भाग, अभिजन वर्गाच्या कार्यपद्धतीचा एक भाग म्हणून धोरण आखणी व त्याची अंमलबजावणी कशी होते, हे सुद्धा वस्तुनिष्ठपणे मांडण्यात आले आहे. प्रशासकीय सेवेत काही नितीमूल्ये जबाबदारी, मनोबल, जनसंपर्क हे साधने वा विचाराची उपयुक्तता प्रतिपादन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474157285605,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sarvajanik-Prashasan-Aani-Vyavsthapan-Part2_cnvt-1.jpg?v=1772092634","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}