{"product_id":"साहित्य-विचार-भारतीय-व-पाश्चात्य","title":"साहित्य विचार (भारतीय व पाश्चात्य)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसाहित्य आणि समाज यांचे जवळचे संबंध आहेत. कारण लेखक हा समाजाचाच घटक असतो. समाजात वावरताना त्याला भलेबुरे अनुभव येतात त्याचे चित्र तो साहित्यकृतीतून रेखाटतो म्हणून साहित्य म्हणजेच जीवनाचा आरसा होय असे म्हटलेले आहे आणि ते योग्य आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘साहित्य विचार’ ह्या पुस्तकाची निमिर्ती ही विद्यार्थी हित लक्षात घेऊन करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तकात एकूण आठ प्रकरणामध्ये साहित्याविषयी विचार मांडण्यात आलेला आहे. प्रत्येक प्रकरणाची सविस्तर, सुलभ व सोप्या भाषेत मांडणी केलेली आहे. या ग्रंथात साहित्याचे स्वरूप, काव्य शब्दांची व्याप्ती, संस्कृत साहित्यकारांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे तसेच पाश्चात्य साहित्यकारांची साहित्य लक्षणे, मम्मटाची साहित्य प्रयोजने, पाश्चात्यांची साहित्य प्रयोजने, साहित्यनिर्मितीची प्रक्रिया, प्रतिभाशक्ती, कल्पनाशक्ती, चमत्कृती, व्युत्पत्ती, स्फूर्ती आणि साहित्य प्रकाराची संकल्पना, साहित्याची भाषा, साहित्य आणि समाज, साहित्याची अभिरुची तसेच रसविचार, रीतिविचार, अलंकार विचार, वक्रोक्ती विचार इत्यादी घटकांचा सविस्तर आढावा प्रस्तुत ग्रंथातून घेतलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, मराठीचे अध्यापन करणारे प्राध्यापक बंधुनाही अध्यापनासाठी निश्चित उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48414484693221,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sahitya-Vichar_Dr-Ananda-Sonawane_cnvt-1-198x300.jpg?v=1771065059","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}