{"product_id":"हवामानशास्राची-मूलतत्त्वे-आणि-प्रात्यक्षिके-fundamentals-of-climatology-and-practicals","title":"हवामानशास्राची मूलतत्त्वे आणि प्रात्यक्षिके (Fundamentals of Climatology and Practicals)","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eभूगोल ही पृथ्वी, पर्यावरण आणि मानव यांच्यातील परस्परसंबंधांचा व्यापक अभ्यास करणारी ज्ञानशाखा आहे. त्यामध्ये हवामानशास्त्र ही वातावरणातील विविध प्रक्रिया, हवामानातील बदल आणि त्यांचा मानव व पर्यावरणावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करणारी अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. आज हवामान बदल, जागतिक तापमानवाढ, अतिवृष्टी, दुष्काळ, चक्रीवादळे आणि इतर तीव्र हवामान घटनांमुळे हवामानशास्त्राचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या विषयाचा अभ्यास केवळ परीक्षेपुरता मर्यादित न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे.\u003cbr\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) नुसार कौशल्याधारित आणि अनुभवाधारित शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर “हवामानशास्त्राची मूलतत्त्वे आणि प्रात्यक्षिके” हे पुस्तक पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. या पुस्तकात हवामानशास्त्राच्या मूलभूत संकल्पना, वातावरणाची ऊर्जा प्रणाली, वातावरणीय अभिसरण, आर्द्रता, वृष्टी, हवामान बदल, जागतिक तापमानवाढ यांसारख्या विषयांचे शास्त्रीय व सोप्या भाषेत विवेचन केले आहे. तसेच हवामान निरीक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची माहिती, त्यांचा वापर, हवामान नकाशांचे वाचन व विश्लेषण, समभार रेषा प्रारूपे आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) हवामान अहवालांचा अभ्यास यांचा प्रात्यक्षिक स्वरूपात समावेश करण्यात आला आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक तयार करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा, विविध संदर्भग्रंथांचा, भारतीय हवामान विभागाच्या साहित्याचा तसेच अध्यापन व संशोधनातील अनुभवाचा आधार घेतला आहे. विषयाची मांडणी विद्यार्थ्यांना सहज समजेल, त्यांची संकल्पना स्पष्ट होईल आणि प्रात्यक्षिक कौशल्यांचा विकास होईल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52906334683365,"sku":"9789377761080","price":235.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/HawamanshastrachiMultatve_Kudnar-1.jpg?v=1789810518","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b9%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87-fundamentals-of-climatology-and-practicals","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}