Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

विचार आणि विचारवंत

आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत

Modern Indian Political Thinkers

,

Rs.275.00

आधुनिक भारताचा प्रारंभच मुळात ब्रिटिशांच्या आगमनानंतरचा आहे. ब्रिटिशांनी सोबत आणलेली नवीन पुष्ये व नवीन विचार भारतीयांसाठी नवीन होते. त्यातून सामाजिक आर्थिक, धार्मिक सुधारणांना प्रारंभ झाला व या नवीन बदलाचे पडसाद एकूण भारतीय जीवनावर पडले व त्यामुळे विचारमंथनालाही चालना मिळाली. राजा राम मोहन रॉय यांनी त्यास वैचारिक आधार देऊन प्रबोधनकालाचा प्रारंभ केला. महात्मा जोतिराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, नामदार गोखले, आगरकर, न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नवरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरु, अरविंद घोष, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, एम. एन. रॉय, मौलाना आझाद, राम मनोहर लोहिया इत्यादी विचारवंतांनी भारतातील बदलत्या परिस्थितीला अनुरुप व भविष्यकालीन उपाययोजना म्हणून तत्कालीन आवश्यकतेतून व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर चिंतन करुन वैचारिक मांडणी केली आहे.

आधुनिक भारतीय विचारवंतांनी भारताचे स्वातंत्र्य, भारताचा राजवाद, आंतराष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, भारतातील आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय प्रश्न त्यासाठी करावयाची उपाययोजना, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा भारत, शासनाचे परराष्ट्र धोरण, अंतर्गत योजना, राज्यघटना शासन पद्धत इत्यादी संदर्भात वेळोवेळी व्यक्त करण्यात आलेले राजकीय विचार हाच भारताचा राजकीय विचाराचा वारसा आहे व त्याचा आधार घेऊन या देशाची राजकीय जडण-घडण संपन्न झाली असून, भारताचा राजकीय विकास होत आहे. म्हणूनच आधुनिक भारतीय राजकीय विचारांचा अभ्यास हा आवश्यक ठरतो.

Aadhunik Bharatiya Rajkiya Vicharwant

  1. राजा राममोहन रॉय : 1.1 परिचय, 1.2 सामाजिक विचार व सुधारणा, 1.3 स्त्री-पुरुष समानता, 1.4 धार्मिक विचार, 1.5 राजकीय विचार, 1.6 वृत्तपत्र स्वातंत्र्याविषयी विचार, 1.7 कायदा संबंधीचे विचार, 1.8 रॉय यांचे न्याय व्यवस्थेसंबंधीचे विचार व सुधारणा, 1.9 शिक्षणविषयक विचार व सुधारणा
  2. दादाभाई नवरोजी : 2.1 परिचय, 2.2 दादाभाईंचे राजकीय विचार, 2.4 स्वातंत्र्य आंदोलनातील योगदान, 2.5 मूल्यमापन
  3. लोकमान्य टिळक : 3.1 प्रास्ताविक, 3.2 टिळकांचा जहालमतवाद, 3.3 राजकीय विचार, 3.4 प्रतियोगी सहकारिता, 3.5 लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक, 3.6 काँग्रेस लोकशाही पक्ष, 3.7 होरूल लीग चळवळ, 3.8 सामाजिक सुधारणाविषयक विचार व दृष्टिकोन
  4. महात्मा गांधी : 4.1 जीवनपरिचय, 4.2 गांधीजींवरील प्रभाव व त्यांची ग्रंथरचना, 4.3 सत्य व अहिंसेसंबंधी विचार, 4.4 सत्याग्रह, 4.5 साध्य आणि साधन, 4.6 राजकारणाचे आध्यात्मीकरण, 4.7 अस्पृश्यता तसेच जातीऐक्याबद्दल गांधीजींचे विचार, 4.8 जाती व्यवस्थेला विरोध
  5. पं. जवाहरलाल नेहरू : 5.1 जीवन परिचय, 5.2 नेहरूंची ग्रंथरचना व त्यावरील प्रभाव, 5.3 लोकशाहीसंबंधीचे विचार, 5.4 लोकशाही समाजवादासंबंधी विचार, 5.5 नेहरूप्रणीत लोकशाही समाजवादाची वैशिष्ट्ये, 5.6 नियोजन व आर्थिक विकास, 5.7 नियोजनाची उद्दिष्ट्ये, 5.8 लोकशाही
  6. नेताजी सुभाषचंद्र बोस : 6.1 जीवन परिचय, 6.2 राजकीय प्रभाव, 6.3 नेताजींची ग्रंथसंपदा, 6.4 सुभाषचंद्र बोस यांची वैचारिक अधिष्ठाने, 6.5 लोकशाहीसंबंधी विचार, 6.6 स्वराज्यविषयक विचार, 6.7 परराष्ट्र धोरण, 6.8 सामाजिक विचार, 6.9 महिलाविषयक विचार, 6.10 युवकांसंबंधी विचार
  7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : 7.1 जीवन परिचय, 7.2 ग्रंथरचना, 7.3 भारतीय घटनानिर्मिती-घटनावार, 7.4 लोकशाही : सामाजिक व राजकीय लोकशाही, 7.5 भारतातील परिस्थिती आणि लोकशाही, 7.6 सामाजिक लोकशाही, 7.7 जाती संस्थेचे विश्लेषण, 7.8 जाती व्यवस्थेबद्दल आंबेडकरांची मते
  8. डॉ. राममनोहर लोहिया : 8.1 डॉ. लोहियांचे राजकीय विचार, 8.2 राजकीय तत्त्वज्ञान, 8.3 समाजवादी विचार, 8.4 राज्यासंबंधीचे विचार, 8.5 डॉ. लोहिया व प्रजासत्ताक पद्धती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत”
Shopping cart