Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

आपत्ती जोखीम निवारण

Disaster Rise Reduction

, ,

Rs.175.00

विद्यार्थी आणि शिक्षकवर्गासाठी सुनियोजित ज्ञानसंग्रह म्हणून या आपत्ती व्यवस्थापन ग्रंथाची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आपत्ती जोखीम मूल्यमापन – संकट/आपत्ती संकल्पना, जोखीम, असुरक्षितता आणि आपत्ती, आपत्ती जोखीमेचे मुल्यांकन, भारतातील आपत्ती-पूर, दुष्काळ, भूकंप आणि चक्रवात, मानव निर्मित आपत्ती, आपत्ती जोखीम किमानता मार्ग, आपत्ती शमन व प्रतिबंध आपत्ती शमन व प्रतिबंध, आपत्ती धोका व्यवस्थापन योजना अंमलबजावणी दूर संवेदनाची भूमिका इत्यादी घटकांची सविस्तर मिमांसा केलेली आहे. स्वतःच्या जीविताचे रक्षण करतानाच इतरांच्या जीविताचे रक्षण कसे करता येईल याचसाठी आपत्ती व्यवस्थापन अत्यावश्यक झालेले आहे. प्राणीहानी बरोबरच वित्तहानी थांबवून विकास प्रक्रिया गतिमान करण्यासाठी, तुम्हा, आम्हा सर्वांसाठी हे आपत्ती जोखीम कपात!

Aapatti Jokhim Kapat

  1. आपत्ती जोखीम मूल्यमापन : अ) संकट/आपत्ती संकल्पना, जोखीम, असुरक्षितता आणि आपत्ती, ब) आपत्ती जोखीमेचे मुल्यांकन
  2. भारतातील आपत्ती : अ) कारणे, परिणाम, वितरण आणि नकाशे-पूर, दुष्काळ, भूकंप आणि चक्रवात, ब) मानवी आपत्ती (मानव निर्मित आपत्ती)-कारणे, परिणाम, वितरण आणि नकाशे
  3. आपत्ती जोखीम किमानता मार्ग : पूर्वतयारी, आपत्ती शमन व प्रतिबंध – व्याख्या विशेष प्रक्रिया व पर्यायी मुद्दे, अ) पूर्वतयारी – जनजागृती निर्मिती, माहिती व्यवस्थापन, पूर्व खबरदारी, माहिती प्रसारण प्रणाली सूचना, सामाजिक सहभाग, विशेष कृती गट निर्मिती, प्रशिक्षण आणि नियोजनाची पूर्वतयारी, प्रत्यक्ष कृती., ब) आपत्तीशमन – आपत्ती जोखीम परत्वे माहिती, आपत्तीमुळे निर्माण झालेल्या नुकसानीचे विश्लेषण, संभाव्य आपत्ती, प्रभाव कमी करण्यासाठी पर्याय, आपत्तीशमन नियोजनाची तयारी., क) प्रतिबंध – आपत्ती स्वरूप व त्याची तीव्रता कमी करण्यासाठीच्या उपायांचे विश्लेषण, आपत्ती प्रतिबंधक नियोजनाची तयारी
  4. आपत्ती धोका व्यवस्थापन योजना अंमलबजावणी दूर संवेदनाची भूमिका : आपत्ती धोका व्यवस्थापन योजनाविषयी शासकीय आणि अशासकीय संस्था, संघटनाशी देवाण-घेवाण, संसाधनांचा सुयोग्य वापर, देखरेख व मूल्यमापन, आपत्ती धोका व्यवस्थापन, धोका हस्तांतरण आणि विमा योजना यांची भूमिका, आपत्ती धोका व्यवस्थापनात दूर संवेदन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांची भूमिका

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आपत्ती जोखीम निवारण”
Shopping cart