Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

आधुनिक कार्यालय व्यवस्थापन आणि संकल्पना

Modern Office Management And Concept

,

Rs.295.00

आधुनिक व्यापार व्यवसायात व्यापार व उद्योगाचे स्वरुप अतिशय झपाट्याने बदलत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादनाच्या पध्दतीतदेखील महत्त्वपुर्ण बदल घडत आहे. त्यामुळे व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी उत्तम व्यवस्थापन ही अपरिहार्य गोष्ट झाली आहे. व्यवस्थापनाचे कार्य अधिक गुंतागुंतीचे होत असल्याने त्यातील व्यक्तींना विविध पातळीवर निर्णय घ्यावे लागतात, धोरणे ठरवावी लागतात. आवश्यक तेव्हा त्यात बदल करावे लागतात. निर्णयाची अंमलबजावणी करुन त्यावर देखरेख व नियंत्रण ठेवावे लागते. व्यवस्थापनाची ही विविध कामे करतांना संघटनेच्या कार्यालयाकडून उपलब्ध होणारी माहिती व इतर सेवा यांच्या मदतीशिवाय व्यवस्थापकाला आपली जबाबदारी पार पाडणे शक्य नाही.

सदर पुस्तकात आधुनिक कार्यालय, कार्यालय व्यवस्थापन, कार्यालयाची अंतर्गत रचना, कार्यपद्धती व कार्यप्रणाली, कार्यालयीन पर्यावरण, कार्यालय दस्तऐवजांचे व्यवस्थापन, कार्यालय संघटन, कार्यालयीन सेवा, कार्यालयीन स्टेशनरी आणि इतर सामग्री, स्वयंचलीत कार्यालय, सचिव पद्धती तसेच कार्यालयाच्या सभा इत्यादी गोष्टींवर सविस्तर चर्चा केलेली आहे. प्रस्तुत पुस्तकात आधुनिक कार्यालय व्यवस्थापन हा विषय अत्यंत सोप्या आणि जास्तीत जास्त प्रभावी व आकलनक्षम भाषेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Adhunik Karyalay Vyavsthapan Aani Sankalpana

 1. आधुनिक कार्यालय : कार्यालय : अर्थ, व्याख्या व महत्त्व, कार्यालयाची पारंपरिक आणि आधुनिक संकल्पना, कार्यालयाची कार्ये आणि गुणवैशिष्ट्ये, कार्यालयाचे बदलते स्वरुप
 2. कार्यालय व्यवस्थापन : कार्यालय व्यवस्थापन : संकल्पना, व्याख्या आणि स्वरूप, कार्यालयीन व्यवस्थापनाचे घटक, कार्यालय व्यवस्थापक : कार्य, कर्तव्ये आणि जबाबदार्‍या, परिणामकारक व्यवस्थापन तंत्रे
 3. कार्यालयाची अंतर्गत रचना : कार्यालयाची अंतर्गत रचना : अर्थ, व्याख्या आणि महत्त्व, कार्यालयाच्या अंतर्गत रचनेची निवड : उद्दिष्ट्ये आणि तत्वे, कार्यालयाची अंतर्गत रचनेचे घटक
 4. कार्यालय पद्धती आणि कार्यप्रणाली : कार्यालय पद्धत : अर्थ, उद्दिष्टप्रणाली आणि प्रक्रिया, कार्यप्रवाह : उद्दिष्ट्ये आणि आदर्श कामातील अडचणी, कार्यप्रवाहातील अडथळ्यांवरील उपाययोजना, कार्यालयातील कार्यनियोजन आणि कामाचे वेळापत्रक
 5. कार्यालयीन वातावरण : कार्यालयाचे वातावरण : अर्थ, संकल्पना, प्रभावित करणारे घटक, कार्यालय वातावरणाचे महत्त्व, कार्यालयीन सुरक्षितता आणि उपाययोजना
 6. कार्यालयीन नोंदींचे व्यवस्थापन : कार्यालयीन नोंद : अर्थ आणि महत्त्व, दप्तर खात्याचे संघटन, नोंदी आणि फाईलींचे नस्तीकरण व सूचीकरण, नस्तीकरणाच्या अत्याधुनिक पद्धती व त्यांच्या सुविधा, कागदपत्रांची विल्हेवाट/कागदपत्रे निकालात काढणे, कागदविरहीत कार्यालय
 7. कार्यालय संघटन : कार्यालय व्यवस्थापक, कार्यालयीन कर्मचारी, कार्यालयीन चौकशी, कार्यालयातील जनता संपर्क कार्य
 8. कार्यालयीन सेवा : कार्यालयीन सेवा, कार्यालयीन प्रपत्र, आधुनिक टपाल सेवा
 9. कार्यालयातील स्टेशनरी आणि इतर सामग्री : स्टेशनरीची गरज व महत्व, स्टेशनरी खरेदी नियंत्रणासाठी आवश्यक घटक, कार्यालयीन सामग्रीचे प्रमाणीकरण, स्टेशनरी वापरावर नियंत्रण
 10. कार्यालयीन यंत्रे व साधने : कार्यालयीन यंत्रे व साधने, कार्यालयातील उपकरणांचे प्रमाणीकरण, कार्यालय कार्यक्रमाचे संगणकीकरण, कामकाजाच्या नोंदी
 11. सचिवाची प्रक्रिया : सचिवाची पात्रता आणि गुण, सचिवाची कार्ये व भूमिका, कार्यालयीन पत्रव्यवहार
 12. कार्यालयीन बैठका : कार्यालयीन सभा : अर्थ, व्याख्या, विविध प्रकारच्या सभा आणि उद्देश, सभा कार्यपद्धती, सभा यशस्वी होण्यासाठी आवश्यक घटक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आधुनिक कार्यालय व्यवस्थापन आणि संकल्पना”
Shopping cart