Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मानसशास्त्र

आधुनिक उपयोजित मानसशास्त्र आणि मानवी जीवन

Modern Applied Psychology and Human Life

,

Rs.210.00

आजच्या काळात मानसशास्त्राचे स्वरूप प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. व्यक्ती जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये मानसशास्त्राचे कार्य वाढलेले आहे असे म्हणता येईल. मानवी वर्तनाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात मानसशास्त्राच्या उपयोजित शाखा निर्माण झालेल्या आहेत. या शाखाद्वारे मानवी जीवन अधिकाधिक सुसह्य कसे करता येईल याकडे लक्ष दिले जाते. वाढते औद्योगिकरण आणि तंत्रज्ञान यामुळे मानवी व पर्यावरणीय समस्याही वाढलेल्या आहेत. या समस्या सोडविण्याचा प्रयत्न उपयोजित मानसशास्त्रज्ञ करतात. उपयोजित मानसशास्त्राचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, सैद्धांतिक व उपयोजित मानसशास्त्रीय संशोधन आणि मानसशास्त्रीय सेवा यांच्या दिर्घकाळ योगदानामुळेच आज उपयोजित मानसशास्त्राचे क्षेत्र खुप विस्तृत झालेले आहे. मानसशास्त्राचा प्रचंड आवाका लक्षात घेता सर्व समस्यांचा एकत्रित अभ्यास करणे कठीण झालेले आहे. म्हणूनच उपयोजित मानसशास्त्राच्या विविध शाखा उदयास आलेल्या आहे. सदर पुस्तकात उपयोजित मानसशास्त्राच्या अभ्यासपद्धती, प्रायोगिक व अप्रायोगिक आणि प्रदत्त संकलनाची तंत्रे, मुलाखत, निरीक्षण, सर्वेक्षण, मानसशास्त्रीय चाचण्या, व्यक्तीवृत्त याचप्रमाणे मानसशास्त्राच्या विविध शाखांचाही यथायोग्य परामर्श घेतला आहे.

Adhunik Upyojit Manasshastra Ani Manvi Jeevan

  1. उपयोजित मानसशास्त्राची ओळख : 1.1 उपयोजित मानसशास्त्राची व्याख्या व स्वरूप, 1.2 उपयोजित मानसशास्त्राची क्षेत्रे, 1.3 उपयोजित मानसशास्त्रातील दृष्टिकोन, 1.4 अप्रायोगिक अभ्यास पद्धती, 1.5 प्रदत्त संकलनाची साधने
  2. लोकसमुहाचे मानसशास्त्र : 2.1 लोकसमुह मानसशास्त्राची व्याख्या व स्वरूप, 2.2 लोकसमुह मानसशास्त्राची क्षेत्रे, 2.3 लोकसमुहाच्या समस्या, 2.4 प्रतिबंधात्मक कार्यक्रम, 2.5 उपयोजन-लोकसमुहाच्या मानसिक आरोग्यासाठी उपयोजन
  3. चिकित्सात्मक उपयोजन : 3.1 मानसोपचार-व्याख्या, समानता आणि फरक, 3.2 उपचारकर्ता व रूग्ण संबंधाचे महत्त्व, 3.3 मानसोपचार पद्धतीचे प्रकार, 3.4 वर्तनवादी उपचार पद्धती, 3.5 सकारात्मक विचार व स्वंसमोहनाचे जीवनातील उपयोजन
  4. आरोग्य मानसशास्त्र : 4.1 आरोग्य ः स्वरूप, व्याख्या व प्रकार, 4.2 ताण व ताणके, 4.3 ताणाचे महत्त्वाचे परिणाम, 4.4 ताण कमी करणे, 4.5 उपयोजन – योगा, ध्यान, शिथिलिकरण व आग्रहीपणा
  5. सामाजिक उपयोजन : 5.1 उदासिन वर्तन मानसशास्त्र-सामाजिक व राजकीय उदासिनता, 5.2 दहशतीचे मानसशास्त्र कारणे आणि प्रतिबंध, 5.3 सामाजिक बदलांचे मानसशास्त्र-सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम, 5.4 भ्रष्टाचारांचे मानसशास्त्र कारणे आणि प्रतिबंध, 5.5 प्रचाराचे मानसशास्त्र – सामाजिक वर्तनावरील परिणाम
  6. गुन्हेगारीे मानसशास्त्र : 6.1 गुन्हेगारी – व्याख्या व स्वरूप, 6.2 गुन्हेगारीची कारणे, 6.3 गुन्हेगारीचे प्रकार, 6.4 उपाययोजना, 6.5 उपयोजन – गुन्हेगारी वर्तन नियंत्रित करणे
  7. सकारात्मक मानसशास्त्र : 7.1 सकारात्मक मानसशास्त्र – व्याख्या, गृहितके, उद्दिष्टे आणि महत्त्व, 7.2 स्वास्थाचे मानसशास्त्र – स्वरूप आणि गरज, 7.3 आनंद – व्याख्या, प्रकार व व्यक्ती जीवनातील परिणाम, 7.4 व्यक्तिनिष्ठ स्वास्थ, 7.5 उपयोजन-भावनिक, मानसिक आणि सामाजिक जीवन
  8. संप्रेषण आणि मुलाखत उपयोजन : 8.1 संप्रेषण प्रक्रिया – व्याख्या, स्वरूप आणि प्रकार, 8.2 प्रभावी संप्रेषण, 8.3 मुलाखत – व्याख्या आणि प्रकार, 8.4 सामान्य शिष्टाचार, 8.5 व्यवसायिक जीवनातील उपयोजन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आधुनिक उपयोजित मानसशास्त्र आणि मानवी जीवन”
Shopping cart