Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

साहित्य समीक्षा

आंबेडकरी निष्ठेचा विचारवाहक वामनदादा कर्डक

Rs.350.00

अनंता सूर या नव्या दमाच्या अभ्यासकाने संपादित केलेले ‌‘आंबेडकरी निष्ठेचा विचारवाहक: वामनदादा कर्डक’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे ही अत्यंत आनंददायी घटना आहे. वामनदादांच्या जन्मशताब्दी वर्षाचा संदर्भ या संपादनाला आहे. हे मौलिक संपादन करून अनंता सूर यांनी वामनदादांना कृतज्ञतापूर्वक अभिवादनच केलेले आहे. या मौलिक कार्यासाठी मी त्यांना धन्यवादही देतो आणि त्यांचे अभिनंदनही करतो.
वामनदादा महाप्रतिभावंत होते. बाबासाहेबांचे इहकेंद्री समन्यायी तत्त्वज्ञान त्यांनी लोकांच्या मनांमध्ये प्रस्थापित केले. आंबेडकरी चळवळीतील चढउतारही त्यांनी जिवाच्या आकांताने मांडले. बाबासाहेबांनी उभारलेल्या संग्रामात त्यांनी महायोद्ध्याची भूमिका केली. बाबासाहेबांच्या चळवळीतले ते सौत्रान्तिक महाभिक्खू होते. त्यांच्या हयातीतच वामनदादा एक अनोखी आणि तेजःपुंज महाआख्यायिका झाले होते. या महाआख्यायिकेचा वेध घेणारे अनेक मान्यवरांचे लेख वाचकांना या पुस्तकात वाचायला मिळतील. या लेखांसोबतच वामनदादांचे साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण आणि वामनदादांसंबंधीच्या दोन मुलाखतीही या पुस्तकात वाचायला मिळतील.
या मौलिक पुस्तकाचे संपादक अनंता सूर यांना वामनदादांचे सर्वच चाहते मनापासून धन्यवाद देतील ही खात्री मला आहे.

– यशवंत मनोहर

Ambedkari Nishthecha Vicharwahak Wamandada Kardak

 1. तुफानातील मृत्युंजय वामनदिवा!  – डॉ. यशवंत मनोहर
 2. लोककवी वामनदादा कर्डक – दया पवार
 3. कवी, कलावंतांच्या शिरपेचातील कोहिनूर : लोककवी वामनदादा कर्डक – प्रा. वामन निंबाळकर
 4. वामनदादा कर्डक : लोकमान्य लोककवी – प्रा. फ. मुं. शिंदे
 5. लोककवीचे महानिर्वाण – डॉ. गंगाधर पानतावणे
 6. लोककवी : वामनदादा कर्डक – प्रा. विलास वाघ
 7. वामनदादा कर्डक: माणसातले दादा आणि दादातला माणूस – केशव हंडोरे
 8. लोकभूषण वामनदादा कर्डक – प्रा. प्र. ई. सोनकांबळे
 9. निळ्या जगातला वामन कर्डक – राजा ढाले
 10. एक तुफान शांत झाले – ज. वि. पवार
 11. माणूसकीचा मळा फुलविणारा माळी ः वामनदादा कर्डक – डॉ. सुनीलकुमार लवटे
 12. आंबेडकरी अंकुशाने लोकभाषेची माहूतगिरी करणारा महाकवी: वामनदादा कर्डक – सुरेश साबळे
 13. हे शेत वामनाचे – प्रा. इंद्रजित भालेराव
 14. युटोपियन गझलकार : वामनदादा कर्डक – प्रमोद वाळके
 15. वामनदादा कर्डकांच्या गीतातील बळ – डॉ. दीपकराज कापडे
 16. वामनदादांची बाबासाहेबांचा विचार सांगणारी गीते – डॉ. अविनाश मेश्राम
 17. वामनदादा कर्डक : विद्रोहाचा बुलंद आवाज – डॉ. माधव जाधव
 18. वामनदादा कर्डकांच्या काव्यातील मानवतावादी धम्मविचार – डॉ. भास्कर पाटील
 19. लोकांचा, लोकांसाठी लिहिणारा गायक, कवीः वामनदादा – प्रा. शिवाजी वाठोरे
 20. वामनदादांचा प्रबोधन विचार – डॉ. राजेंद्र गायकवाड
 21. वामनदादांनी आंबेडकरी कार्यकर्त्यांना दिलेला संदेश – प्रा. प्रदीप मेश्राम
 22. वामनदादा कर्डक यांच्या गीतरचनेतील शैक्षणिक विचार – डॉ. रंगनाथ नवघडे
 23. वामनदादा कर्डक यांच्या काव्यातील स्त्री – किरण शिवहरी डोंगरदिवे
 24. वामनदादा कर्डक:आंबेडकरी चळवळीच्या प्रतिभेचा कंठमणी – भीमराव सरवदे
 25. वामनदादांच्या गझला : आस्वाद आणि आकलन – प्रशांतकुमार डोंगरदिवे
 26. आंबेडकरी निष्ठा जोपासणारा महाकवीः वामनदादा कर्डक – प्रा.भास्कर बंगाळे
 27. आंबेडकरी विचारांचा वादळवारा ः वामनदादा कर्डक – डॉ. सतेज दणाणे
 28. वामनदादा कर्डकांची गीतकविता – प्रा.अनिल नितनवरे
 29. बाबासाहेबांचा विचार तळागाळात रुजविणारा महाकवी:वामनदादा कर्डक – डॉ. अनंता सूर

परिशिष्टे :

 • वामनदादा कर्डक यांचे अध्यक्षीय भाषण
 • डॉ.यशवंत मनोहर यांची प्रा.अशोक जाधवांनी घेतलेली मुलाखत
 • लोककवी प्रा.प्रशांत मोरे यांची डॉ.अनंता सूर यांनी घेतलेली मुलाखत
 • वामनदादा कर्डक यांचा जीवनपट

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आंबेडकरी निष्ठेचा विचारवाहक वामनदादा कर्डक”
Shopping cart