Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

संरक्षणशास्त्र

आण्विक शस्त्रास्त्रे विरोधी चळवळी व राजकारण

Anti - Nuclear Weapons Movement and Politics

Rs.350.00

अण्विक शस्त्रांस्त्रांचे अस्तित्व मानवी समाजासमोरील गंभीर समस्या बनली आहे. आण्विक शस्त्राच्या निर्मितीमुळे आंतरराष्ट्रीय शांततेला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. दुसर्‍या महायुध्दानंतर जागतिक राजकारणात आपले नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि रशिया यांच्यात शस्त्रास्त्रे निर्मितीची स्पर्धा सुरु झाली. त्यासाठी भूतलात, अंतराळात, समुद्रात, अणूचाचण्या केल्या गेल्या. अणूबाँबनंतर हायड्रोजन बाँबची, रासायनिक, जैविक शस्त्रास्त्राची निर्मीती केली गेली. शस्त्रास्त्र स्पधेंतून अणूबाँबसारख्या विध्वंसक शस्त्रांची निर्मिती झाली. आण्विक शस्त्रास्त्रांमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यासाठी अमेरिका व रशिया या महासत्तामध्ये स्पर्धा सुरु झाली. या दोन महासत्ताबरोबर आण्विक शस्त्रास्त्र निर्मितीत तंत्रज्ञान जगात इतरत्रही पसरत गेले. या शस्त्रास्त्र स्पर्धेतून अणूयुध्दाचा धोका वाढला.

दुसर्‍या महायुध्दात जपानमधील हिरोशीमा आणि नागासाकी या शहरावर अमेरिकन अणुबाँब टाकून कल्पनेपलीकडचा विध्वंस घडवून आणला. या दोन हल्ल्यामुळे अणूबाँबची भितीच जगाला बसली. त्यानंतरच्या कित्येक पिढयांना हे बाँब हल्ल्याचे परिणाम भोगावे लागले.

अलीकडच्या काळात उत्तर कोरिया, इराण या देशांनी अणूबाँब निर्मीतीच्या कार्यक्रमात जोरदार प्रगती केल्यामुळे सगळे जग चिंताग्रस्त झाले आहे. जगाला सुरक्षित व भयमूक्त जीवनाची प्राप्ती व्हावी या भूमिकेतून अण्वस्त्र मूक्त जग हा या चळवळीचा प्रधान हेतू आहेत. आज ज्याप्रमाणे जागतिक पातळीवर आण्विक शस्त्रास्त्र विरोधी चळवळी कार्यरत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक देशता अण्वस्त्र निर्मीतीला विरोध करणार्‍या चळवळीही कार्यरत आहेत. अलीकडेच 2010 सालच्या एप्रिल महिन्यात अमेरिका व रशिया यांच्यात अण्वस्त्रांविषयाची चर्चा होऊन त्यांच्याकडील अण्वस्त्रात कपात करण्याच ठरवल. जगात उपलब्ध आण्विक शस्त्रांपैकी 98% शस्त्रास्त्रे या दोन देशांकडे असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा आहे.

Anvik Shastrastre Virodhi Chalvali V Rajkran

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आण्विक शस्त्रास्त्रे विरोधी चळवळी व राजकारण”
WordPress › Error

There has been a critical error on this website.

Learn more about troubleshooting WordPress.