Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

अर्थशास्त्र

भारतीय आर्थिक पर्यावरण

Indian Economic Environment

, ,

Rs.375.00

भारतीय आर्थिक पर्यावरण (Indian Economic Environment) या अभ्यासक्रमावर आधारित क्रमिक आणि संदर्भ पुस्तकात 6 प्रकरणांचा समावेश केलेला आहे. पहिले प्रकरण व्यवसायाचे आर्थिक पर्यावरण हे आहे. यात उद्योग व्यवसायासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहेत यांची सैद्धान्तिक आणि व्यावहारीक अशी मांडणी केली आहे. दुसर्‍या प्रकरणात उद्योग व्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक असणार्‍या कृषी आणि पायाभूत संरचना यांची मांडणी केली आहे. यात 2020 चे कृषी विधेयक, श – छअच ची चर्चा केली आहे. तिसर्‍या प्रकरणात 1991 चे औद्यागिक धोरण, औद्योगिक विकास व समस्या, खासगीकरण व निर्गुंतवणुकीकरण, मर्जर अँड टेकओव्हरची समर्पक मांडणी केली आहे. चौथ्या प्रकरणात औद्योगिक कामगार, कामगार कायदे, कामगार संघटना, औद्योगिक कलह, औद्योगिक आजारपण 2013 चा आजारी कंपन्या संदर्भातील कायदा, नादारी आणि दिवाळखोरी कोड यांची विस्तृत चर्चा केली आहे. पाचव्या प्रकरणात उद्योग व्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक असणार्‍या भाववाढ, नाणेबाजार, भांडवल बाजार, स्टॉक मार्केट आणि विदेशी भांडवलाची मांडणी केली आहे. सहाव्या प्रकरणात सरकारचे वित्तीय धोरण, चलनविषयक धोरण, विदेश व्यापार धोरण, ऋएठअ आणि ऋएचअ यांचा आढावा घेतला आहे.

Bharatiya Arthik Paryavaran

  1. व्यवसायाचे आर्थिक पर्यावरण – एक परिचय : 1.1 व्यवसाय, 1.2 पर्यावरण, 1.3 व्यावसायिक पर्यावरण, 1.4 व्यावसायिक पर्यावरणातील सरकार व अर्थतज्ज्ञांची भूमिका, 1.5 भारतातील व्यावसायिक पर्यावरण
  2. कृषी, पायाभूत संरचना आणि व्यवसायाचे आर्थिक पर्यावरण : 2.1 भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व / भूमिका, 2.2 कृषीवर प्रत्यक्ष / थेट अवलंबून असणारे व्यवसाय, 2.3 भारताचे कृषी धोरण : एक अवलोकन, 2.4 कृषी विधेयक 2020, 2.5 E-NAM – National Agriculture Market, 2.6 पायाभूत संरचना, 2.7 पायाभूत उद्योगांचे उत्पादन, 2.8 वाहतूक आणि दळणवळण क्षेत्र
  3. भारतीय औद्योगिक पर्यावरण : 3.1 भारताच्या औद्योगिक विकासातील औद्योगिकरणाची भूमिका, 3.2 1991 नंतरचे उदारीकरण आणि औद्योगिक वृद्धी, 3.3 भारतातील औद्योगिक विकासाच्या समस्या, 3.4 1991 चे नवीन औद्योगिक धोरण, 3.5 खाजगीकरण आणि निर्गुतवणुक, 3.6 कंपनी ताब्यात घेणे / अधिग्रह आणि विलीनीकरण
  4. औद्योगिक कामगार, औद्योगिक संघर्ष, औद्योगिक आजारपण आणि व्यवसायाचे आर्थिक पर्यावरण : 4.1 भारतीय श्रमिकांची वैशिष्टे, रोजगार व कामाच्या ठिकाणची स्थिती, 4.2 भारतातील सामाजिक सुरक्षा व कामगार संघटना, 4.3 कामगार संघटना, 4.4 औद्योगिक कलह, 4.5 औद्योगिक आजारपण, 4.6 2013 चा कंपनी कायदा:आजारी कंपन्यांचे पुनरूज्जीवन आणि पुनर्वसनासाठी तरतूद, 4.7 नादारी आणि दिवाळखोरी कोड
  5. वित्तीय बाजार, विदेशी भांडवल आणि व्यवसायाचे आर्थिक पर्यावरण : 5.1 भाववाढ, 5.2 नाणे बाजार, 5.3 भांडवल बाजार, 5.4 स्टॉक एक्सचेंज, 5.5 विदेशी भांडवल
  6. सरकारचे धोरण आणि व्यवसायाचे आर्थिक पर्यावरण : 6.1 वित्तीय आणि चलनविषयक धोरण, 6.2 भारतीय कर रचना, 6.3 राष्ट्रीय औद्योगिक निर्मिती धोरण, 6.4 2015-2020 चे विदेश व्यापार धोरण, 6.5 खासगी विदेशी भांडवलावर नियंत्रण

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय आर्थिक पर्यावरण”
Shopping cart