Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

इतिहास

भारताचा इतिहास (इ.स.1206 ते इ.स.1526 पर्यंत)

History of Indian (From 1206 A.D. to 1526 A.D.)

, , , ,

Rs.275.00

मध्ययुगीन भारताचे स्थूल मानाने दोन कालखंड गृहीत धरले जातात. एक म्हणजे सुलतान कालखंड व दुसरा मोगल कालखंड. सुलतानशाहीच्या कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. सुलतान तुर्क आणि अफगाण वंशातील होते. त्यांना भारतीय धर्म, संस्कृती व तेथील जीवनपद्धती याबद्दल काडीचीही आस्था नव्हती. त्यांनी येथील राजे व त्यांचे सैन्य यांचा पराभव करुन या देशाचा लष्करी ताबा मिळविला होता. दिल्ली सुलतानशाहीच्या 320 वर्षाच्या इतिहासातील संघर्षाला राजकीय आणि धार्मिक असे दुहेरी स्वरुप आलेले दिसते. दिल्ली सुलतानशाहीत पाच घराणी होऊन गेली. इब्राहीम लोदी दिल्ली सुलतानशाहीचा शेवटचा सुलतान होय. 21 एप्रिल, 1526 च्या पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहीम लोदीस ठार केले. त्याचबरोबर दिल्लीची सुलतानशाही नष्ट झाली.

प्रस्तुत ग्रंथात सुलतानशाहीकालीन भारतातील इतिहासाची साधने, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला-स्थापत्य आणि प्रशासन यांचा आढावा घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथाचा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी, विद्यार्थी, प्राध्यापक व वाचकांसाठी निश्चित उपयोग होईल.

Bhartacha Itihas (1206-1526)

  1. कुतुबुद्दीन ऐबकापूर्वी भारतातील परिस्थिती : महंमद घोरीच्या भारतावरील स्वार्‍या, कुतुबुद्दीन ऐबक – गुलाम घराण्याचा संस्थापक (1206-1210), शम्सुद्दीन अल्तमश (1211 ते 1236) – दिल्ली सुलतानशाहीचा खरा संस्थापक; महत्त्वाची कार्ये, अल्तमशचे प्रशासन, रझिया सुलतान (1236-40) – रुकनुद्दिन फिरोज विरुद्ध बंडे, विरोधकांची संभ्रमावस्था, घियासुद्दीन बल्बन (1266-1286) – बल्बनचे पूर्वजीवन, बल्बनची राज्यव्यवस्था, बल्बनची योग्यता, बल्बनचे वारस
  2. अल्लाउद्दीन खिलजी (1290-1296) : अल्लाउद्दीन खिलजीच्या मोहिमा, देवगिरीवर स्वारी (1296), जलालुद्दीनची हत्या, अल्लाउद्दीन खिलजी (1296-1316) – अल्लाउद्दीनच्या प्रारंभिक अडचणी, अल्लाउद्दीन खिलजीचा राजसत्तेचा सिद्धांत; महंमद बिन तुघलक (1325-51) – तुघलक घराणे, महंमद तुघलकाचे निरनिराळे प्रयोग, फिरोझ तुघलक (इ.स. 1351-1388) – विविध सुधारणा/कार्ये, योग्यता, तैमूरलंगाची भारतावर स्वारी (1398-99) – सय्यद आणि लोदी घराणे – सय्यद घराणे (1414-1450); लोदी घराणे – 1) बहलोल लोदी (1451 ते 1489) 2) सिंकदर लोदी (1489-1517)
  3. बहामनी साम्राज्य – बहामनी साम्राज्याचा उदय : 1) हसनची राजवट (1347-1358) 2) महंमद शाह पहिला (1358-1375) 3) मुजाहिदशहा (1375-1377) 4) महंमद शाह द्वितीय (1378-1397) 5) फिरोजशहा (1397-1422), विजय नगरचे साम्राज्य – 1) हरिहर (इ.स. 1336 ते 1353) 2) बुक्क पहिला (इ.स. 1353-1379) 3) हरिहर दुसरा (इ.स. 1379-1404)
  4. सुलतानशाहीकालीन केंद्रीय प्रशासन : 1) सुलतान 2) दिवाण-ए-वझारत (पंतप्रधान) 3) दिवाण-ए-अरिझ (सैन्य मंत्रालय) 4) दिवाण-ए-इन्शा (पत्रव्यवहार मंत्रालय), सुलतानशाही कालखंडातील राज्य व समाज – 1) कुलीन किंवा सत्तारूढ वर्ग (अहल-ए-दौलत) 2) बुद्धीवादी वर्ग (अहल-ए-कलम किंवा अहल-ए-सादत) 3) व्यापारी वर्ग, सुलतानशाहीच्या काळातील स्त्रियांची स्थिती – 1) विवाह 2) घटस्फोट 3) पडदा पद्धत 4) जोहार पद्धत 5) सती पद्धत 6) स्त्री-शिक्षण
  5. सुलतानशाहीकालीन आर्थिक व तांत्रिक विकास : सुलतानशाहीकालीन शेती-व्यवसाय; सुलतानशाही काळातील व्यापार, व्यापारी जमाती, वस्तूंच्या किंमती, सुलतानशाहीच्या काळातील उद्योगधंदे
    दिल्ली सुलतानकालीन साहित्य व शिक्षण – 1) पर्शियन साहित्य 2) संस्कृत आणि हिंदी साहित्य 3) उर्दू साहित्य 4) सय्यद व लोदी घराण्यातील स्थापत्य-कला, धार्मिक चळवळी – 1) भक्ती चळवळ, भक्ती मार्ग चळवळीतील प्रमुख संत 2) महानुभाव पंथ – महानुभाव पंथाची ग्रंथसंपदा

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारताचा इतिहास (इ.स.1206 ते इ.स.1526 पर्यंत)”
Shopping cart