Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

भूगोल आणि पर्यावरणीय आपत्ती

Geography and Environmental Hazards

Rs.225.00

जगामध्ये पर्यावरणीय आपत्ती कोठेही, कशाही पद्धतीने, कोणत्याही परिस्थितीत निर्माण होतात. याला काही भौगोलिक कारणाबरोबरच मानवही तितकाच जबाबदार घटक आहे. नैसर्गिक आणि मानवी क्रियांमुळे पर्यावरणात अनेक भयंकर स्वरुपाच्या घटना घडून येतात. महाभयंकर, विध्वंसक अशा स्वकरुपाच्या घटनांमध्ये भूकंप, ज्वालामूखी, महाप्रलयकारी पूर, त्सुनामी लाटा, भूमीपात, दरडी कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्ती निर्माण होतात. नुकतेच नेपाळमधील भूकंप किंवा पुणे जिल्ह्यातील माळीण या गावावर डोंगर कोसळून संपूर्ण गाव नष्ट होण्याची दुर्घटना यासारखी अनेक उदाहरणे आपत्तीच्या संकटांची तीव्रता लक्षात आणून देतात. वातावरणीय आपत्तींमध्ये अवर्षण, चक्रीवादळे, हिमवर्षाव, ढगफुटी, गारा, हिमवर्षाव, हिमवृष्टी, उष्ण व शीत लाटा, विजा चमकणे यासारख्या नैसर्गिकरित्या निर्माण होणार्‍या आपत्तींमुळे प्राणहानी व वित्तहानी घडून येते. हेतूपुरस्कर काही मानवनिर्मित आपत्ती घडून येतात. त्यामुळे निर्वनीकरण, वाळवंटीकरण, दहशतवाद, बॉम्बस्फोट, दंगली इ. चा समावेश होतो. तसेच जैविक स्वरुपाच्या आपत्तींमध्ये वनस्पतीजन्य व प्राणीजन्य जैविक आपत्तींचा समावेश होतो.

Bhugol Ani Paryavaraniya Aapatti

  1. पर्यावरणीय आपत्ती : आपत्ती- संकल्पना, व्याख्या, स्वरूप, निर्मिती, पर्यावरणीय आपत्तीचे वर्गीकरण, हेतुपुरस्पर मानवनिर्मित आपत्ती, प्रकार, व्याप्ती; आपत्ती- नैसर्गिक, वातावरणीय, जैैविक, मानवनिर्मित
  2. नैसर्गिक आपत्ती : नैसर्गिक आपत्ती : प्रस्तावना व व्याख्या, नैसर्गिक आपत्तीची निर्मिती, नैसर्गिक आपत्तीचे स्वरूप, नैसर्गिक आपत्तीचे प्रकार, भारतीय इतिहासामधील सर्वात दु:खद व मोठया नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक आपत्तीचे परिणाम
  3. भूकंप आणि ज्वालामुखी : भूकंप, व्याख्या, कारणे, भारतातील भूकंप व त्याचे वितरण; जागतिक भूकंपाचे वितरण, रिंग ऑफ फायर; भूकंप निर्मितीच्या घटना, त्सुनामी लाटा, ज्वालामुखी, भूकंप व ज्वालामुखीचे जागतिक वितरण, भूमिपात, दरडी कोसळणे, भूरस्खलन, भूविवर्तनिकी, विदारण, मृदा धूप
  4. अवर्षण : अवर्षणांचे प्रकार, अवर्षणाची कारणे, अवषर्णाचे परिणाम, उपाययोजना, अवर्षण गस्त प्रदेश, भारतातील अवर्षण गस्त प्रदेश, जगातील अवर्षणगस्त प्रदेश, अवर्षण घटना, उपाययोजना/भविष्यकालीन नियोजन
  5. पूर : पूराची कारणे, पुराचे परिणाम, विधायक परिणाम, कोसी नदी, पूरनियंत्रणाचे उपाय, जगातील पूरगस्त प्रदेश, सरासरी वार्षिक पूरामुळे होणारे नुकसान, 1980 ते 2008 या काळात आलेल्या महापूरामुळे झालेले नुकसान, वार्षिक जगातील 15 देशातील पूरगस्त लोकांची संख्या; अतिवृष्टी, ढगफुटी, हिमवृष्टी, हिमवादळे, गारा, चक्रीवादळे
  6. जैविक आपत्ती : जैविक आपत्तीचे प्रकार; आग/वणवा, तणफैलाव, जलपर्णी उपद्रव, बुरशी/बुरशीजन्य रोग, किडी व व्यवस्थापन – विविध पिकांवरील विषाणूजन्य रोग, रोपवाटीकेवरील महत्वाच्या किडी, एकात्मिक किड नियंत्रण; प्राणीजन्य जैविक आपत्ती कवक, जीवाणू, परागकण, विषाणू, सजीव कणरूप हवा प्रदुषके; टोळधाड, हिंस्र पशु हल्ला, विविध रोग आणि रोगांच्या साथी
  7. पर्यावरण व प्रदूषण : जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरण, ग्लोबल वार्मिग, हरितगृह परिणाम, पृथ्वीच्या तापमान वाढीची प्रमुख कारणे, जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरण, हरितगृह, विविध हरितगृह वायू : उगम स्त्रोत व परिणाम, हरितगृहाचे परिणाम, आम्ल पर्जन्य, ओझोनचा र्‍हास, प्रदुषण, प्रदुषणाची कारणे/उगमस्थाने, प्रदूषणाचे प्रकार
  8. आपत्ती व्यवस्थापन व संकल्पना : आपत्ती व्यवस्थापन व संकल्पना, आपत्तीचे स्वरूप त्यातील हानी आणि धोका, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्ती निवारण्यासाठी कार्य, विविध पातळीवरील संघटना स्थापना, आपत्तीचे नियोजन, आपत्ती निवारण, पुनर्वसन व पुर्नरचना कार्य

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भूगोल आणि पर्यावरणीय आपत्ती”
Shopping cart