Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मराठी

गावांजली

(काव्यसंग्रह)

Rs.125.00

प्रा. डॉ. ज्ञानेेश्वर शिवाजी सूर्यवंशी (1 जून 1969) मूळचे मुडी प्र डा., ता.अमळनेर, जि.जळगांव, महाराष्ट्र येथील रहिवासी असून सध्या ते विद्यावर्धिनी महाविद्यालयात भूगोलशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा 24 वर्षे शिकविण्याचा, 20 वर्षे संशोधनाचा, 17 वर्षे प्रशासकीय अनुभव आहे. त्यांनी 2002 मध्ये क.ब.चौ.उ.म.वि., जळगांव कडून आदिवासींचे आरोग्य भूगोलशास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त केली. नोव्हेंबर 2016 ते ऑगस्ट 2019 पर्यंत ते विद्यावर्धिनी महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी डिसेंबर 2015 ते ऑक्टोबर 2016 पर्यंत ते क.ब.चौ.उ.म.वि., जळगांवच्या आजीवन शिक्षण मंडळाचे संचालक होते. त्यांना भारतीय प्रगत अध्ययन संस्था, शिमला कडून 2009-11 ची शिष्यवृत्ती प्राप्त होती. तसेच भारतीय दूरस्थ संवेदन संस्था, डेहराडून मध्ये 2006 ला त्यांनी प्रशिक्षण घेतले. आतापर्यंत त्यांनी 10 संशोधन प्रकल्प विविध संस्थांना सादर केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 17 विद्यार्थीनी पीएच.डी. व एम.फील. पूर्ण केले आहे. लेखन व संपादनात त्यांनी 187 पेक्षा अधिक संदर्भ ग्रंथ, संपादित पुस्तके व नियतकालिके, पुस्तके, संशोधनात्मक लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केले आहेत. सुमारे 16 पेक्षा अधिक परिषदा, चर्चासत्र, कार्यशाळाचे आयोजन त्यांनी केले आहे. द.कोरिया, मलेशिया, श्रीलंका येथील परिषदांमध्ये त्यांनी सादरीकरण केले आहे. डॉ. सूर्यवंशी हे क.ब.चौ.उ.म.वि. च्या अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य (2016-19) होते. तसेच ते भूगोल अभ्यास मंडळ व विज्ञान विद्याशाखा सदस्य म्हणून 10 वर्षे कार्यरत होते. त्यांना दिव्य मराठीचा ‌‘आदर्श शिक्षक’ (2020), क.ब.चौ.उ.म.वि. चा ‌‘उत्कृष्ट प्राचार्य’ (2017), अमेरिकन विज्ञान संस्थेकडून ‌‘प्रवास अनुदान’ (2013), म.भू.प., पुणेचा ‌‘तरुण भूगोलतज्ज्ञ’ (2012), भारतीय सामाजिक संस्था, नवी दिल्ली कडून ‌‘तरुण सामाजिक शास्त्रज्ञ’ (2011), क.ब.चौ.उ.म.वि. कडून उत्कृष्ट ‌‘रासेयो कार्यक्रम अधिकारी’ (2008) यासारखे पुरस्कार प्राप्त आहेत. ते अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भूगोल संस्थाचे आजीव सभासद असून कार्यकारिणी सदस्य आहेत.शोशत विकास, अधिवासीचे आरोग्य व भूऔषधशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय असून सामाजिक चळवळीत त्यांनी दायित्व दिले आहे. अलीकडे त्यांनी ‌‘काव्यांजली’ व ‌‘निसर्गावली’ हे काव्यसंग्रह प्रकाशित केले आहेत.

1. गाव माझं, 2. जागल्या, 3. जलामदार, 4. छकड, 5. बैलजोडी, 6. शेती, 7. लक्ष्मी, 8. काय येतं आईला?, 9. रंगू, 10. नात्याचा नाश, 11. संघर्ष यात्री, 12. डबेवाला, 13. गावची शान, 14. माझी शाळा, 15. कोरोना, 16. मैत्री कैची, 17. नातं, 18. संघर्ष, 19. गेलो शहराकडे, 20. उमेद, 21. स्थलांतरित मजूर, 22. गाय, 23. स्त्री, 24. मित्र एकत्र, 25. असे ही दिवस, 26. लोकशाहीची थट्टा, 27. नाते संबंध, 28. पक्ष्याची मैफिल, 29. तूला, 30 माह्यं जीवन, 31. गारोडी, 32. नाच्या, 33. जत्रा, 34. जलतिरोनी, 35. काठी, 36. चाक, 37. पाचर, 38. धुलाई कपड्याची, 39. रेशन, 40. दुकानवाला भाऊ, 41. टपरी, 42. कर्तनालय, 43. झोपडी, 44. दिवा, 45. विजेचा खांब, 46. देऊळ, 47. प्रतीक, 48. सोबती, 49. पुजाऱ्याचा रोजगार, 50. माणसं जोडणं, 51. धन्वंतरी, 52. भामट्या

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गावांजली”
Shopping cart