Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

जाहिरात तंत्र आणि व्यूहरचना

Advertising Techniques and Strategies

,

Rs.175.00

मानवी जीवनाशी जाहिरातीचा नेहमी संबंध येतो. मानवाचा जाहिरातीशी संबंध केवळ वस्तू व सेवा यांना प्रसिद्धी देणे तसेच त्यांच्या निवडीला मदत करणे इतका मर्यादित नाही. तर सामाजिक, राजकीय, शासकीय, शैक्षणिक, कृषी अशी विविध क्षेत्रांशी जाहिरातीचा संबंध येतो. आज जाहिरात, आधुनिक तंत्रज्ञानामुळे आकर्षक होत आहे. वस्तू व सेवांची माहिती विविध जाहिरातीच्या माध्यमाद्वारे ग्राहकांच्या मान्सशास्त्राचा वापर करुन त्याला वस्तू खरेदी करण्यासाठी डावपेच आखले जातात. आजच्या जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरण यामुळे बाजारपेठ क्षेत्र आंतरराष्ट्रीय झाले आहे. अशा परिस्थितीत केवळ वस्तू दर्जेदार असणे आवश्यक नाही तर त्याविषयी माहिती परिणामकारकपणे पटवून देणे महत्त्वाचे कार्य जाहिरातीद्वारे केले जाते. या पुस्तकात जाहिरातीची ओळख, जाहिरात माध्यमे, जाहिरातीतील सर्जनशिलता, जाहिरात अंदाजपत्रक, जाहिरात संस्था, जाहिरातीचे नियमन आणि नियंत्रण या घटकांचा समावेश आहे.

Jahirat Tantra aani Vyuharchna

  1. जाहिरातीची ओळख : प्रस्तावना, जाहिरात -अर्थ, व्याख्या व वैशिष्ट्ये, जाहिरातीचे स्वरुप आणि व्याप्ती, आधुनिक विपणनातील जाहिरातीचे महत्त्व, विपणन मिश्रतील जाहिरातीची भूमिका, जाहिरातीचे वर्गीकरण व प्रकार, जाहिरातीचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम.
  2. जाहिरात माध्यमे : जाहिरात माध्यम – अर्थ व व्याख्या, जाहिरात माध्यमांचे वर्गीकरण किंवा प्रकार, छापील जाहिरात माध्यमांचे फायदे किंवा गुण, इलेक्ट्रॉनिक जाहिरात माध्यमांचे फायदे आणि मर्यादा, बर्हिगत जाहिरात माध्यमे – फायदे आणि मर्यादा, चल किंवा धावत्या वाहनावरील जाहिरात माध्यमे, जाहिरात माध्यमाची निवड करताना लक्षात घ्यावयाचे घटक, जाहिरात माध्यम मिश्र, माध्यम वेळापत्रक, माध्यम नियोजन
  3. जाहिरातीतील सर्जनशिलता : प्रस्तावना, जाहिरात मसुदा (मजकूर) – अर्थ, व्याख्या, छापील जाहिरात मसुदाचे घटक, चांगल्या जाहिरात मसुद्याची गुणवैशिष्ट्ये किंवा वैशिष्ट्ये, जाहिरात मसुदा लेखनाचे प्रकार, जाहिरातीचा आराखडा
  4. जाहिरात अंदाजपत्रक : प्रस्तावना, जाहिरात अंदाजपत्रक म्हणजे काय?, जाहिरात अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये, जाहिरात अंदाजपत्रकाचे महत्व, जाहिरात अंदाजपत्रकाची प्रक्रिया, जाहिरात अंदाजपत्रक तयार करण्याच्या पद्धती, जाहिरात अंदाजपत्रकाचे दृष्टीकोन, जाहिरात अंदाजपत्रकाचे फायदे, जाहिरात अंदाजपत्रकाच्या मर्यादा
  5. जाहिरात संस्था : प्रस्तावना, जाहिरात संस्था म्हणजे काय?, जाहिरात संस्थेची ठळक वैशिष्ट्ये, जाहिरात संस्थांकडून दिल्या जाणार्‍या सेवा, जाहिरात संस्थेची उत्क्रांती-ऐतिहासिक मागोवा, जाहिरात संस्था निवडीचे निकष, जाहिरात संस्था आणि खातेदार नातेसंबंध, जाहिरातीमधील कारकिर्दचे पर्याय, जाहिरात संस्थेचे भवितव्य
  6. जाहिरातीचे नियमन आणि नियंत्रण : प्रस्तावना, भारतीय जाहिरात मानके परिषद, भारतीय जाहिरात मानके परिषदेची उद्दिष्ट्ये, भारतीय जाहिरात मानके परिषदेच्या अधिनियमाची वैशिष्ट्ये, दूरदर्शन अधिनियम, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, जाहिरात नैतिक मूल्ये, जाहिरातमधील नैतिक वर्तन, जाहिरातमधील अनैतिक वर्तन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जाहिरात तंत्र आणि व्यूहरचना”
Shopping cart