Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

चरित्र / आत्मचरित्र / व्यक्तिचरित्र

काळजातील पोलीस महासंचालक

Rs.299.00

पोलीस विभाग नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. या अगोदरही पोलिसांचे ताणतणाव, आत्महत्या त्यावरील उपाययोजना, पोलिसांच्या बदल्या, पोलीस प्रमुख पदाची सूत्र कोणाच्या हातात जाणार याबाबत सतत बातम्या कानावर पडत असतात. कधी त्या नकारात्मक असतात तर कधी सकारात्मक असतात. त्याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल विनोद अहिरे यांचे ‌‘काळजातील पोलीस महासंचालक’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे, ही एक चांगली बाब आहे. आजच्या घडीला पोलिसांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत, त्यांचे अनेक प्रश्न आहेत, पण संजय पांडेंसारखा पोलीस महासंचालक त्या अडचणी समजून घेऊन त्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करतात. त्याचमुळे पोलिसांना बारा वरून वीस रजा मंजूर होतात तसेच प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याचे अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण होते.

– पद्मश्री उज्वल निकम
विशेष सरकारी वकील महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक श्री. संजय पांडे यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित काळजातील पोलीस महासंचालक हा ग्रंथ प्रकाशित होत आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या कार्याची चिकित्सात्मक मांडणी करून पुस्तक लिहावे कदाचित ही महाराष्ट्र पोलीस दलातील पहिलीच घटना असावी. तसेच सदर पुस्तकाचे लेखक श्री. विनोद अहिरे हे आमच्या जळगाव जिल्हा पोलीस घटकात कार्यरत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

– डॉ. महेश्वर रेड्डी, भा.पो.से.
पोलीस अधीक्षक, जळगाव

काळजातील पोलीस महासंचालक हे पुस्तक सध्या कार्यरत असलेले अधिकारी/ कर्मचारी तसेच भावी पिढीला देखील प्रेरणा देत राहील.

– अशोक नखाते
अपर पोलीस अधीक्षक, जळगाव

 1. काळजातील पोलीस महासंचालक
 2. पहिल्याच दिवशी पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा
 3. पोलीस महासंचालकांचा सुखद धक्का
 4. मागील आठवड्यात केलेली कामे
 5. बारा वरून वीस किरकोळ रजा
 6. दूरदृष्टीतून पोलीस पाल्यांना आरक्षण
 7. साप्ताहिक सुटीच्या आदल्या दिवशी रात्रीचे गस्त नको
 8. प्रत्येक पोलीस कर्मचारी होणार अधिकारी
 9. महिला पोलिसांना आठ तासांचे कर्तव्य
 10. यशाचे श्रेय सहकारी अधिकाऱ्यांना
 11. परिवर्तनवादी पोलीस महासंचालक
 12. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी शिवशाही बस
 13. घटक पोलीस कल्याण निधीतून बदली प्रवास अग्रीम
 14. राखीव पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीसाठी शासनाला प्रस्ताव
 15. निवृत्तांच्या आरोग्यावर प्रकाश
 16. अपर पोलीस अधीक्षकांना गणवेश अनुदान
 17. कॉन्स्टेबल राज्याचा डीजीपी झाला पाहिजे
 18. पोलीस खेळाडूंसाठी एक टप्पा पदोन्नती
 19. फेसबुक लाईव्ह
 20. पोलीस अंमलदारांना एक महिन्याचा अधिक पगाराचा प्रस्ताव
 21. एसआरपीएफ जवानांचे दैनंदिन वेळापत्रक बदलले
 22. पीएसआयला अपर पोलीस अधीक्षक पदापर्यंत पदोन्नतीचा प्रस्ताव
 23. वैद्यकीय बिल घटक प्रमुखांना मंजुरीचा अधिकार
 24. मुंबईकरांशी थेट संवाद साधून सुरक्षेची हमी
 25. समतावादी पोलीस अधिकारी
 26. संडे स्ट्रीट
 27. चुकीच्या पोलीसिंगबद्दल कडक इशारा
 28. मुंबई पोलिसांना वाहतूक भत्ता
 29. सेवानिवृत्ती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “काळजातील पोलीस महासंचालक”
Shopping cart