Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

खान्देश

खानदेशमधील राष्ट्रवादाचा उदय आणि विकास (खानदेशचा इतिहास)

Rs.595.00

इतिहासाचे पुनर्लेखन ही जशी काळाची गरज आहे तसेच प्रादेशिक इतिहास लेखन हे सुद्धा आवश्यक आहे. आजपर्यंत भारतीयांनी प्रादेशिक इतिहासाकडे दुर्लक्ष केले. वास्तविक पाहता स्वातंत्र्याच्या चळवळीत हिंदुस्थानातील सर्व प्रदेशांचे योगदान आहे. पण त्यांच्या कार्याची फारशी नोंद झाली नाही. ती व्हावी या हेतूने हा ग्रंथ लिहिला आहे. यांत राजकीय चळवळीबबरोबर सत्यशोधक चळवळ, गुला महाराजांचे भिल्लांतील प्रबोधन, मंदिर प्रवेशाची चळवळ, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी झालेले प्रयत्न, हिंदुस्थानातील ग्रामीण भागात काँग्रेसचे प्रथमच भरलेले फैजपूरचे अधिवेशन व त्यात शेतकर्‍यांसंबंधी झालेले ठराव आदि अनेक गोष्टींचा आढावा घेतला आहे. खानदेशमध्ये मोठ्या प्रमाणात भिल्ल व आदिवासी लोक आहेत. त्यांनीच पहिल्या प्रथम ब्रिटीश सत्तेला खानदेशच्या भूमीवर विरोध केला. म्हणून खर्‍या अर्थाने ते महाराष्ट्रातील आद्य क्रांतीकारक होत. काझीसिंग व भागोजी नाईक आदि भिल्ल क्रांतीकारकांनी 1857 च्या उठावात भाग घेवून खानदेशमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटविण्याचा प्रयत्न केला. अशा वंचित नि उपेक्षित जनता व प्रदेशाचा इतिहास उजेडात आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा ग्रंथ होय.

Khandeshmadhil Rashtravadacha Uday Ani Vikas (Khandeshcha Itihas)

 1. खानदेशचा विस्तार व अभ्यासाची साधने : खानदेश स्तोत्र, खानदेश नावाची व्युत्पत्ती, खानदेशचा विस्तार, खानदेशच्या अभ्यासाची साधने- (अ) अप्रकाशित साधने (ब) प्रकाशित साधने, राष्ट्रवाद म्हणजे काय?, खानदेशमध्ये राष्ट्रवाद उदयास येण्यास कारणीभूत झालेले घटक.
 2. खानदेशमधील भिल्ल, शेतकरी आणि 1857 चा उठाव : पेशवे काळातील भिल्लांचे हक्क, कॅ.ब्रिग्जची भिल्लाविरुद्ध मोहिम, खानदेशमध्ये किल्लेदारांचा ब्रिटिशांना झालेला विरोध- (अ) थाळनेर (ब) अमळनेर (क) मालेगाव, माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टनचे उदार धोरण, उठावांची मालिका
 3. खानदेशमधील प्रारंभीच्या काळातील चळवळी : काँग्रेसच्या प्रारंभीच्या अधिवेशनास उपस्थित असलेले खानदेशचे प्रतिनिधी, गरुड हायस्कूल, पाताळे व्यायामशाळा, सत्कार्योत्तेजक सभेची स्थापना , गणपति व शिवजन्मोत्सवास प्रारंभ, पैसा फंड, हातमागाचा कारखाना, रायगड स्मारक निधी
 4. खानदेशमधील असहकाराची चळवळ : नागपूर अधिवेशन व खानदेशमधील असहकाराची चळवळ, दोंडाईचे येथे राष्ट्रीय शाळेची स्थापना, मुळशी पेटा सत्याग्रह आणि खानदेश, खिलाफत चळवळ, खानदेशामध्ये स्वराज्य पक्ष, विधायक कार्यक्रमाचा प्रचार, पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ
 5. महात्मा गांधीजींचा खानदेश मधील दौरा (इ.स.1927) : संपूर्ण खानदेशाचा दौरा, पश्चिम खानदेशमध्ये गांधीजींचा प्रवेश, महात्मा गांधीजींचे विविध कार्यक्रम, निजामपूरला मानपत्र, लोकमान्य टिळकांच्या फोटोचे अनावरण – कुसुंब्याला सभा – मोराण्याला भेट – मालेगावकडे प्रयाण
 6. सविनय कायदेभंगाची चळवळ : महात्मा गांधीजींच्या अकरा मागण्या, दाण्डी यात्रेत खानदेशचे तरुण, कायदेभंगापूर्वीची खानदेशमधील परिस्थिती, कायदेभंग मंडळाची स्थापना, पश्चिम खानदेशमध्ये कायदेभंगाचा प्रचार, विलेपार्ले येथे खानदेशचे स्वयंसेवक
 7. खानदेशमधील सत्यशोधक समाजाची वाटचाल : एकोणिसाव्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची पार्श्वभूमी, कॅ. विश्वासराव देवरे, सत्यशोधकी जलसे, कुंभार गुरुजींचे कार्य
 8. फैजपूर काँग्रेस : महाराष्ट्राने आमंत्रणाची बाजी जिंकली, अधिवेशनाची तयारी, फैजपूर काँग्रेसची अपूर्वता (ध्वजज्योती), पं. जवाहरलाल नेहरु यांची मिरवणूक, अधिवेशनाच्या कार्यक्रमाची रुपरेषा
 9. चले जाव आंदोलन 1942 : ‘करेंगे या मरेंगे’ घोषणेचा अर्थ, हिंसेचे समर्थन, डांगुर्णे व विटाईची बैठक
 10. खानदेशमधील इतर घटना व चळवळी : 1) अस्पृश्यता नष्ट करण्याचे प्रयत्न
 11. खानदेशातील राष्ट्रवादाची फलश्रूती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “खानदेशमधील राष्ट्रवादाचा उदय आणि विकास (खानदेशचा इतिहास)”
Shopping cart