Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

कृती संशोधन

Action Research

Rs.250.00

संशोधन मानव समाजाला विकासाच्या दिशेने घेवून जाणारे महत्वपूर्ण आणि सशक्त साधन आहे. उपयोगी संशोधन जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात मानवाची प्रगती घडवते. कृती संशोधन म्हणजे आपल्या समस्या शास्त्रीय पद्धतीने स्वतः सोडविण्याची प्रक्रिया आहे. या संशोधनातून मिळालेल निष्कर्ष विशिष्ट क्षेत्रापुरतेच उपयुक्त ठरतात. कृती संशोधन हे शिक्षण प्रक्रियेचे सक्रीय व अविभाज्य अंग आहे. शिक्षण क्षेत्राची विविध अंगे आणि त्यांच्याशी संबंधित घटक हे कृती संशोधनाचे योग्य क्षेत्रे आहेत. कृती संशोधनाद्वारा काही अंतिम निष्कर्ष मिळाले म्हणजे संशोधन झाले असे होत नाही. कृती संशोधनातून मिळणार्‍या निष्कर्षांना पडताळून पाहिल्याशिवाय त्यांना पूर्णपणे विश्वसनीय आणि प्रमाण मानले जावू शकत नाही. यासाठी निष्कर्षांचे मूल्यमापन होणे गरजेचे असते.

भारतात अस्तित्वात असलेल्या विशेष परिस्थिती आणि मर्यादेबाबत मार्गदर्शन आणि समुपदेशनाच्या क्षेत्रात संशोधनाची गरज आहे. आपल्या विशेष गरजा, परिस्थिती आणि संस्कृतीच्या दृष्टीने मार्गदर्शन आणि समुपदेशन पाहिजे. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार मार्गदर्शन व समुपदेशन करणे, त्याची परिणामकारकता अभ्यासणे कृती संशोधनाद्वारे होवू शकते. शिक्षणाच्या संख्यात्मक सुधारणेसाठी शिक्षणाचे उद्दिष्ट आणि ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी अभ्यासक्रम आणि कार्यक्रम संदर्भात संशोधन करणे आवश्यक आहे.

Kruti Sanshodhan

  1. मुलभूत संशोधन, उपयोजित संशोधन आणि कृती संशोधन : 1.1 संशोधनाचा अर्थ, 1.2 शैक्षणिक संशोधन, 1.3 मुलभूत संशोधन, 1.4 उपयोजित संशोधन, 1.5 कृती संशोधनाची अर्थ आणि व्याख्या, 1.6 कृती संशोधनाचे प्रकार, 1.7 कृती संशोधनाची वैशिष्ट्येे, 1.8 कृती संशोधनाची आवश्यकता, 1.9 कृती संशोधनाचे महत्व, 1.10 कृती संशोधनाच्या मर्यादा, 1.11 मुलभूत संशोधन आणि कृती संशोधन यातील फरक, 1.12 कृती संशोधनाचा इतिहास
  2. वर्गखोली आणि शाळाधिष्ठित कार्यक्रमात सुधारणा होण्यासाठी कृती संशोधन : 2.1 कृती संशोधन आणि शिक्षक, 2.2 शाळाधिष्ठित कार्यक्रमात सुधारणा होण्यासाठी कृती संशोधन, 2.3 शाळाधिष्ठित कार्यक्रमात सुधारणा होण्यासाठी कृती संशोधन, 2.4 कृती संशोधनाची क्षेत्रे
  3. कृती संशोधनाची प्रक्रिया : 3.1 कृती संशोधन प्रक्रियेतील पायर्‍या, 3.2 एन.सी.ई.आर.टी.द्वारा विकसित प्रारूप 3.3 कृती संशोधनाचे टप्पे, समस्या ओळख व निश्चिती, समस्येच्या मूळ कारणांची यादी बनवणे, कृती परिकल्पनांची मांडणी, कृती कार्यक्रम, कृती कार्यक्रमाचे मूल्यमापन.
  4. कृती संशोधनासाठी शाळाधिष्ठित प्रकल्प विकास : 4.1 कृती संशोधन आराखडा, 4.2 प्रकल्पाचा आराखडा व त्याची अंमलबजावणी- गृहपाठासंबंधी समस्या, इंग्रजी अध्यापनातील समस्या, पाठात दिग्दर्शन तंत्राचा अभाव.
  5. संशोधनाच्या पद्धती : 5.1 ऐतिहासिक संशोधन पद्धती, 5.2 प्रायोगिक संशोधन, 5.3 वर्णनात्मक/सर्वेक्षण संशोधन पद्धती, 5.4 कारणात्मक-तुलनात्मक संशोधन, 5.5 सहसंबंधात्मक संशोधन, 5.6 तिर्यक संस्कृती आणि तुलनात्मक अध्ययन पद्धती, 5.7 व्यष्टी अभ्यास/नमुना अभ्यास पद्धती
  6. जनसंख्या व नमुना निवड : 6.1 जनसंख्या, 6.2 नमुना निवड
  7. संशोधनाची साधने : 7.1 संशोधनाची साधने, 7.2 पदनिश्चयन श्रेणी, 7.3 निरीक्षण, 7.4 मुलाखत, 7.5 प्रश्नावली, 7.6 अनुसूची, 7.7 शोधिका, 7.8 चाचण्या
  8. माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचनासाठी सांख्यिकी : 8.1 संख्याशास्त्राचा अर्थ, महत्व, 8.2 माहितीचे विश्लेषण व अर्थनिवेचन, 8.3 केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे, 8.4 विचलनशीलतेची परिमाणे, 8.5 सहसंबंध 8.6 प्रमाणित गुण, 8.7 ीं मूल्य, 8.8 काय स्वेअर, 8.9 संगणकाचा वापर
  9. संशोधन अहवाल लेखन : 9.1 संशोधन अहवाल म्हणजे काय?, 9.2 अहवाल लेखनाची रुपरेषा

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कृती संशोधन”
Shopping cart