Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

इतिहास

महाराष्ट्रातील उपेक्षित दुर्गांचा इतिहास

 • ISBN: 9788119120857
 • Maharashtratil Upeshit Durgancha Ithihas
 • Published : April 2024
 • Book Language : Marathi
 • Edition : First
 • Format : Paperback
 • Pages : 120
 • Category:
 • Download Book Ebook Link

Rs.195.00

महाराष्ट्राच्या इतिहासात अगदी शिलाहारांच्या ज्ञात कालखंडापासून इंग्रजांच्या कालापर्यंत दुर्गांचे महत्त्व अनन्यसाधारण राहिले. दुर्गांच्या सहाय्यानेच अनेक राजवटी स्थापन झाल्या, वाढल्या. शिवछत्रपतींनीही दुर्गांच्या सहाय्यानेच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मध्ययुगामध्ये महाराष्ट्रामध्ये किल्ल्यांना खूप महत्त्व होते. बहुतेक इतिहासकारांनी अनेक किल्ल्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा इतिहास, तेथे घडलेल्या पराक्रमाच्या कथा सर्वसामान्यांपर्यंत गेल्याच नाहीत. आज देशातील बहुतेक किल्ले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्यातील बहुतेक दरवाजे, इमारती, पाण्याची ठिकाणे उध्वस्त झालेली आहेत. तटबंदी ढासळत आहे. तेथील मंदिरे उध्वस्त होत आहेत. सध्याच्या काळात अनेकजण किल्ल्यांना भेटी देतात. पण या किल्ल्यात काय घडले किंवा त्या किल्ल्याची रचना कशी होती, त्या किल्ल्यावर कोणी राज्य केले, याची त्यांना काहीच माहिती व कल्पना येत नसल्याने ते नाराज होतात. म्हणून या किल्ल्यांवर घडलेल्या घटनांची एकत्रित नोंद व्हावी आणि किल्ल्यांच्या रक्षणाची प्रेरणा मिळावी, या हेतूने प्रस्तुत ग्रंथलेखन… खान्देश मधील किल्ल्यांच्या संदर्भात माहिती देणारा हा पहिलाच ग्रंथ आहे.

 1. मुल्हेर उर्फ मयुराचल
 2. मालेगावचा भुईकोट किल्ला
 3. सोनगीरचा किल्ला
 4. त्र्यंबकेश्वरचा किल्ला
 5. अंकाई टंकाईचा किल्ला
 6. लळींगचा किल्ला
 7. राजदेहेर किल्ला
 8. भामेर उर्फ भंभागिरीचा किल्ला
 9. गाळण्याचा किल्ला
 10. थाळनेरचा किल्ला

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाराष्ट्रातील उपेक्षित दुर्गांचा इतिहास”
Shopping cart