Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मानसशास्त्र

मानसशास्त्रीय चाचणी

Psychological Testing

Rs.325.00

व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आहे म्हणूनच व्यक्तीमधील ‌‘क्षमता, योग्यता, संपादनवृत्ती, आवड, व्यक्तिमत्त्व गुण, मानसिक स्थिती’ यातही भिन्नता व्यक्तीमध्ये असल्यामुळे उपयोगी मापन यंत्राची आवश्यकता वाटते. यामुळे व्यक्तिमत्त्व घटकांना लक्षात घेऊनच अनेक मानसशास्त्रज्ञांनी चाचण्या तयार केल्या आहेत.
अशा या मानसशास्त्रीय चाचण्या शिस्तबद्धरीत्या व नियमावलीनुसार कराव्या लागतात. तेव्हाच त्यातून योग्य निष्कर्ष मिळतात. प्रत्यक्षात सद्यस्थितीत असलेल्या अभ्यासक्रमातील चाचणीमधील मुद्देसूद टप्पे कोणते? ते रीतसर कसे लिहायचे? याची माहिती मिळणारी पुस्तके बाजारात उपलब्ध नसल्याने शिक्षकासह विद्यार्थ्याची चांगलीच दमछाक होते. पर्यायाने चाचणी करण्याबाबत अनेक अडचणी निर्माण होतात ही अडचण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या मातृभाषेतून सहज व सोप्या पद्धतीने सोडविल्या जाव्या या उद्देशाने या पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे.
या ‌‘मानसशास्त्रीय चाचणी’ पुस्तकातून मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांची गरज पूर्ण होईलच तसेच इतरही व्यक्तीमधील ‌‘बुद्धिमत्ता, अध्ययन, क्षमता, प्रेरणा, व्यक्तिमत्त्व, खुशाली, ताण, दुःख, अपेक्षा, परिपक्वता’ यासोबत इतर गुणांची पडताळणी करुन घेण्यासाठी सुद्धा हे पुस्तक योग्य मार्ग दाखवेल.

Manasshastriya Chachani

प्रकरण 1 
मानसशास्त्रीय चाचणी (Psychological Testing)
• स्वरूप, व्याख्या, उपयोग, प्रकार आणि वर्गीकरण • मानसशास्त्रीय चाचणीचे कार्य • मानसशास्त्रीय चाचणीचा उगम • चाचणीमधील सामाजिक मान्यता, नैतिक मान्यता

प्रकरण 2 
चांगल्या मानसशास्त्रीय चाचणीची वैशिष्ट्ये
(Characteristics of Good Psychological Test)
• विश्वसनीयता – स्वरूप, व्याख्या • विश्वसनीयतेचे प्रकार, गती चाचणीची विश्वसनीयता • वैधता – स्वरूप, व्याख्या, प्रकार • मानक – स्वरूप, व्याख्या प्रकार

प्रकरण 3 
बुद्धिमत्ता (Intelligence)
• सामान्य बुद्धिमत्ता चाचणी • पास अलॉग बुद्धिमत्ता चाचणी • कोहज ब्लॉक डिझाईन चाचणी • प्रमाणित प्रागतिक संघात • शाब्दिक बुद्धी चाचणी
• भावनिक बुद्धिमत्ता मापणी • सामान्य मानसिक क्षमता चाचणी

प्रकरण 4 
अभिवृत्ती (Attitude)
• अभिवृत्ती मापणी • शिक्षण अभिवृत्ती चाचणी संच • वैवाहिक अभिवृत्ती मापणी • धार्मिक अभिवृत्ती मापणी

प्रकरण 5 
अध्ययन (Learning)
• अध्ययन अक्षमता मूल्यमापन मापणी • सामान्य परिहार क्षमता मापणी

प्रकरण 6 
प्रेरणा (Motivation)
• संपादन प्रेरणा चाचणी • सामाजिक प्रेरणा मापणी • आक्रमकता प्रवृत्ती चाचणी

प्रकरण 7 
व्यक्तिमत्त्व (Personality)
• व्यक्तिमत्त्व यादी • घटकात्मक व्यक्तिमत्त्व यादी

प्रकरण 8 
ताण (Stress)
• ताण मापणी • बिस्ट यांचे ताण मापणी संच

प्रकरण 9 
समायोजन (Adjustment)
• समायोजन यादी • शालेय विद्यार्थ्यांसाठी समायोजन यादी

प्रकरण 10 
स्व (Self)
• स्व प्रत्यक्षीकरण यादी • स्व नियंत्रण मापणी

प्रकरण 11 
व्यवसाय (Career)
• व्यवसाय पसंती प्रपत्र

प्रकरण 12 
अभिरुची (Interest)
• शैक्षणिक अभिरुची प्रपत्र

प्रकरण 13 
चिंता (Anxiety)
• चिंता चाचणी

प्रकरण 14 
पूर्वग्रह (Prejudices)
• पूर्वग्रह मापणी

प्रकरण 15 
जीवन समाधान (Life Satisfaction)
• जीवन समाधान मापणी

प्रकरण 16 
अभिक्षमता (Aptitude)
• विविध अभिक्षमता चाचणी

प्रकरण 17 
नेतृत्व (Leadership)
• नेतृत्व गुण क्षमता मापणी

प्रकरण 18 
आत्मविश्वास (Self Confidence)
• आत्मविश्वास यादी

प्रकरण 19 
आकांक्षा (Aspiration)
• शैक्षणिक आकांक्षा मापणी

प्रकरण 20 
सक्षमता (Competence)
• सामाजिक सक्षमता मापणी

प्रकरण 21 
वंचन (Deprivation)
• दीर्घकालीन वंचितता मापणी

प्रकरण 22 
दु:ख (Distress)
• दु:ख मापणी

प्रकरण 23 
नैराश्य (Depression)
• मानसिक नैराश्य मापणी • बैक नैराश्य यादी

प्रकरण 24 
मूल्य (Value)
• नैतिक मूल्य मापणी

प्रकरण 25 
सामाजिक अंतर (Social Distance)
• सामाजिक अंतर मापणी

प्रकरण 26 
स्थिती (Status)
• सामाजिक आर्थिक स्थिती मापणी

प्रकरण 27 
अपेक्षा (Expectation)
• जीवनसाथीदारापासून अपेक्षा मापणी

प्रकरण 28 
मानसिक आरोग्य (Mental Health)
• मानसिक आरोग्य मापणी

प्रकरण 29 
परिपक्वता (Maturity)
• भावनिक परिपक्वता मापणी

प्रकरण 30 
खुशाली (Wellbeing)
• सामान्य खुशाली मापणी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मानसशास्त्रीय चाचणी”
Shopping cart