Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

MCom Semester I

निर्णयनासाठी वित्तीय व्यवस्थापन

M.Com | Sem I | Paper - 414C (NEP 2020 Pattern)

  • ISBN: 9788119120598
  • Nirnayanasathi Vittiya Vyavasthapan
  • Published : December 2023
  • Book Language : Marathi
  • Edition : First
  • Format : Paperback
  • Pages : 128
  • Category:
  • Download Book Ebook Link

Rs.175.00

निर्णयनासाठी वित्तीय व्यवस्थापन या पुस्तकाची अत्यंत साध्या व सोप्या भाषेत मांडणी केलेली आहे. ‌‘वित्तीय व्यवस्थापन’ हा शब्द दोन शब्द ‌‘वित्तीय’ आणि ‌‘व्यवस्थापन’ ह्या शब्दांनी बनला आहे. ‌‘वित्तीय’ शब्दाचा अर्थ हा धन प्राप्तीच्या साधनांना एकत्रित करणे तथा व्यवसायाच्या मौद्रिक आवश्यकतांचे पूर्वानुमान करणे. त्याचे आधारावर ह्या साधनांचे वितरण करणे असा आहे. तर ‌‘व्यवस्थापन’ शब्दाचा अभिप्राय हा एखाद्या संस्थेचे उद्देश प्राप्त करण्यासाठी मानवीय क्रिया आणि भौतिक संसाधनांचे नियोजन, संगठन, समन्वय आणि निर्णय ह्यांच्याशी संबंधित आहे. अशा प्रकारे ‌‘वित्तीय व्यवस्थापन’ ही व्यावसायिक व्यवस्थापनाची ती शाखा आहे जी संस्थेच्या वित्तीय संसाधनांचे नियोजन आणि नियंत्रणाच्या संबंधित आहे अर्थात वित्त कार्याचे व्यवस्थापन.
आधुनिक विचारधारेनुसार वित्तीय व्यवस्थापनाला सामान्य व्यवस्थापनाचेच एक अभिन्न असे मानले जाते. वस्तूत: ते सामान्य व्यवस्थापनाच्या कार्यात्मक क्षेत्राचे स्वरूप आहे. उत्पादन व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, सेवावर्गीय व्यवस्थापनाप्रमाणेच वित्तीय व्यवस्थापन हे कार्यात्मक व्यवस्थापनाच्या श्रेणीत येते. सामान्यत: वित्तीय व्यवस्थापनाचा आशय हा वित्तीय नियोजन, वित्त प्राप्ती, संपत्ती व्यवस्थापन तसेच विविध वित्तीय क्षेत्रात संतुलन स्थापित करणे असा आहे. ह्यात पुंजी, रोख प्रवाह, प्रत्याय, मूल्य आणि लाभ निती, निष्पत्ती नियोजन आणि मूल्यांकन तथा आयव्ययक नियंत्रण निती आणि प्रणाली यांचा समावेश होतो. प्रस्तुत पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.

Nirnayanasathi Vittiya Vyavasthapan

1. वित्तीय व्यवस्थापनाचा परिचय : 
1.1 प्रस्तावना
1.2 वित्तीय व्यवस्थापन : अर्थ आणि व्याख्या
1.3 वित्तीय व्यवस्थापनाची व्याप्ती
1.3.1 प्राथमिक अथवा प्रशासकीय व्याप्ती, 1.3.2 साहाय्यक व्याप्ती, 1.3.3 नैतिक व्याप्ती
1.4 वित्तीय व्यवस्थापनाचे उद्देश
1.4.1 लाभाला अधिकतम करणे/लाभ अधिकीकरण, 1.4.2 संपदा मूल्याला अधिकतम करणे.
1.5 संस्थेतील वित्त कार्य
1.5.1 विनियोग अथवा गुंतवणूक, 1.5.2 वित्तपुरवठा, 1.5.3 लाभांश निर्णय
1.6 वित्ताचे स्रोत
1.6.1 वित्ताचे स्रोत : अर्थ व संकल्पना, 1.6.2 मुदतीच्या आधारावर वित्ताचे स्रोत, 1.6.2.1 वित्ताचे दीर्घमुदती स्रोत, 1.6.2.2 वित्ताचे अल्पमुदती स्रोत
1.7 वित्तीय स्रोताच्या निवडीवर परिणाम करणारे घटक
अभ्यासार्थ प्रश्न.

2. पुंजी संरचना निर्णय : 
2.1 प्रस्तावना
2.2 पुंजी संरचना : अर्थ व संकल्पना.
2.3 पुंजी संरचनेची निवड
2.4 पुंजी संरचनेचे महत्त्व
2.5 इष्टतम पुंजी संरचनेची रचना करणे.
2.5.1 इष्टतम पुंजी संरचना : अर्थ व संकल्पना, 2.5.2 इष्टतम पुंजी संरचनेची मूलतत्त्वे, 2.5.3 इष्टतम/ अनुकूलतम पुंजी संरचना एक कल्पना आहे.
2.6 पुंजी संरचना सिद्धांत
2.6.1 प्रस्तावना, 2.6.2 भांडवल/ पुंजी संरचना : सिद्धांत/विचारधारा, 2.6.2.1 शुद्ध आय सिद्धांत/ शुद्ध आय विचारधारा, 2.6.2.2 शुद्ध परिचालन आय सिद्धांत/शुद्ध परिचालन आय विचारधारा, 2.6.2.3 मोदी गिलायनी व मिलर सिद्धांत/विचारधारा, 2.6.2.4 परंपरागत सिद्धांत/परंपरागत विचारधारा
2.7 पुंजी लागत/भांडवलाचा परिव्यय
2.7.1 प्रस्तावना, 2.7.2 पुंजी लागत/भांडवलांचा परिव्यय : अर्थ व संकल्पना, 2.7.3 पुंजी लागत : वैशिष्ट्ये, 2.7.4 पुंजी लागत : महत्त्व
2.7.5 पुंजी लागत : वर्गीकरण/प्रकार, 2.7.6 पुंजी लागत : गृहीते
2.7.7 विशिष्ट पुंजी लागतची गणना, 2.7.7.1 ऋणाची लागत
अ) अशोधनीय ऋण/अशोध्य ऋणाची लागत, ब) शोधनीय ऋणाची लागत/शोध्य ऋणाची लागत, 2.7.7.2 पूर्वाधिकार अंशाची लागत, 2.7.7.3 समता अंश पुंजीची लागत, अ) लाभांश प्राप्ती पद्धती/लागत मूल्य अनुपात पद्धती/लाभांश पद्धती, ब) आय प्राप्ती पद्धती, क) लाभांश वृद्धी पद्धती, ड) नवीन निर्गमित समता अंशाची लागत, 2.7.7.4 राखीव निधीची लागत, 2.7.7.5 पुंजीची सामूहिक लागत/पुंजीची भारांकित सरासरी लागत.
अभ्यासार्थ प्रश्न.

3. कार्यशील भांडवल/खेळते भांडवल व्यवस्थापन :
3.1 प्रस्तावना
3.2 खेळते भांडवल : व्याख्या
3.3 खेळत्या भांडवलाचे प्रकार
3.4 खेळत्या भांडवलाला प्रभावित करणारे घटक
3.5 खेळत्या भांडवलाची आवश्यकता
3.6 खेळत्या भांडवलाचे स्रोत
3.6.1 दीर्घकालीन स्रोत
3.6.2 अल्पकालीन स्रोत
3.7 खेळत्या भांडवलात स्कंधाची भूमिका
अभ्यासार्थ प्रश्न.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “निर्णयनासाठी वित्तीय व्यवस्थापन”
Shopping cart