Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

पर्यावरण भूगोल

Environmental Geography

,

Rs.175.00

पर्यावरण ही निसर्गाची एक महत्त्वपूर्ण देणगी आहे. पर्यावरणातील सजीव, निर्जीव, पाणी, हवा, माती या सर्व घटकांमध्ये एक क्रमबद्ध व व्यवस्थित संघटन असते. मानव हा स्वत: पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. मानव व पर्यावरण यांच्यात अतूट असे परस्पर संबंध पृथ्वीच्या व मानवाच्या निर्मितीपासूनच निर्माण झालेले आहेत. किंबहुना अनुकूल पर्यावरणातच मानवाचा विकास होऊ शकतो. पर्यावरणातील विविध घटकांमध्ये परस्पर क्रिया-प्रतिक्रिया सतत सुरू असतात व या क्रिया-प्रतिक्रियांचे नियमन निसर्गत:च होत असते. पर्यावरणातील सर्व घटकांमध्ये परस्पर आंतरक्रिया सतत सुरू असतात. पर्यावरणातील हे सर्व घटक निसर्गनियमानुसार कार्य करत असतात. मानव हा पर्यावरणातील सर्व घटकांमध्ये एक सर्वश्रेष्ठ व बुद्धिमान घटक आहे. मानवाच्या गरजा अनंत असून त्या पूर्ण करण्यासाठी मानव पर्यावरणातील घटकांचा वापर करतो. मानवाच्या वाढत्या व अतिरेकी हस्तक्षेपामुळे पर्यावरणात असंतुलन निर्माण होऊन पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. पर्यावरणाची गुणवत्ता ढासळत आहे. विविध पर्यावरणीय घटकांचे प्रदूषण होत आहे. संपूर्ण निसर्गचक्र प्रभावित होत आहे. या सर्व घटनांना मानव स्वत: जबाबदार असून त्याचे दुष्परिणाम त्यालाच भोगावे लागत आहेत. व्यक्तीला बालपणापासून यासंबंधीचे ज्ञान मिळल्यास तो पर्यावरणासंबंधी अधिक काळजी घेईल. मानव व पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंधाच्या दृष्टीने पर्यावरण अभ्यास महत्त्वपूर्ण आहे.

Paryavaran Bhugol

  1. पर्यावरण भूगोल- परिचय : 1.1 पर्यावरणाचे- अर्थ व संकल्पना, 1.2 पर्यावरणाचे प्रकार, 1.3 मानव व पर्यावरण सहसंबंध, 1.4 पर्यावरण भूगोलाच्या व्याख्या, स्वरुप व व्याप्ती, 1.5 पर्यावरण भूगोलाच्या अभ्यासपद्धती (दृष्टीकोन)
  2. परिसंस्था : 2.1 परिसंस्थेच्या व्याख्या व संकल्पना, 2.2 परिसंस्था रचना, 2.3 परिसंस्थेतील पोषकद्रव्यांचे चक्रिकरण, 2.4 परिसंस्थेचे कार्य, 2.5 विविध परिसंस्थांचा अभ्यास
  3. पर्यावरणीय प्रदूषण : 3.1 प्रदूषण व प्रदुषके, 3.2 प्रदूषणांचे प्रकार, अ) हवा प्रदूषण, ब) जलप्रदूषण, क) सागरी प्रदूषण, ड) ध्वनीप्रदूषण, इ) घन कचरा प्रदूषण, 3.3 प्रदूषण नियंत्रणातील वैयक्तिक सहभाग, 3.4 भोपाळ गॅस दूर्घटना, 3.5 मुंबई एक अतिप्रदूषित शहर
  4. पर्यावरणीय समस्या : 4.1 पृथ्वीच्या तापमानातील वाढ, 4.2 ओझोन क्षय, 4.3 आम्लपर्जन्य, 4.4 हरितगृह परिणाम
  5. साधनसंपदा संवर्धन व पर्यावरणीय कायदे : 5.1 साधनसंपदा संवर्धन- अर्थ व संकल्पना, 5.2 साधनसंपदा संवर्धनाची गरज, 5.3 साधनसंपदा संवर्धन, 5.4 पर्यावरण संरक्षण अधिनियम, अ) वनसंसाधन, ब) जलसंसाधन, क) प्राणीसंवर्धन, ड) मृदासंवर्धन, 5.5 पर्यावरण कायदे लागू करण्यात येणार्‍या अडचणी, 5.6 जनजागृती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पर्यावरण भूगोल”
Shopping cart