Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

प्राकृतिक भूगोल

Physical Geography

,

Rs.285.00

प्राकृतिक भूगोल या पुस्तकात भूगोलाच्या विविध अंगाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये काल्पनिक रेषा व पृथ्वीची गती, पृथ्वीचे अंतरंग, भूखंड व महासागरांच्या वितरणांशी संबंधित सिद्धांत, खडक आणि विदारण, बाह्यशक्तीची कारके यात नदी व वारा इत्यादी घटकांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याशिवाय वातावरणाचा अर्थ, वातावरणाची घटना आणि संरचना, तापमान, सौरशक्ती, वायूभार, वारे व वाऱ्याचे प्रकार, आर्द्रता, वृष्टी आणि पर्जन्याचे प्रकार, महासागर तळरचना, या तळरचनेमध्ये हिंदी व अटलांटिक महासागराच्या तळरचनेचा अभ्यास, सागरी प्रवाह, हिंदी व अटलांटिक महासागरातील सागरी प्रवाहाचे चक्र इत्यादी घटकाविषयी अतिशय सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, विविध उदाहरणांद्वारे संकल्पनांचे स्पष्टीकरण, विषयाच्या मांडणीसाठी आवश्यक तेथे आकृत्या, नकाशे आणि वाचकांना विचारप्रवृत्त करणाऱ्या संकल्पनांचे सादरीकरण हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

Prakurtik Bhugol

  1. काल्पनिक रेषा व पृथ्वीची गती : 1.1 पृथ्वीच्या उत्पत्तीचा परिचय, 1.1.1 बिग बँग सिद्धांत, 1.1.2 कांटची तेजोमेघ परिकल्पना, 1.2 काल्पनिक रेषा, 1.2.1 पृथ्वीचा अक्ष/आस, 1.2.2 विषुववृत्त, 1.2.3 कर्कवृत्त आणि मकरवृत्त, 1.2.4 आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त, 1.2.5 अक्षांश आणि रेखांश, 1.3 पृथ्वीची गती, 1.3.1 पृथ्वीचे परिवलन आणि त्याचे परिणाम, 1.3.2 पृथ्वीची परिभ्रमण गती आणि त्याचे परिणाम.
  2. पृथ्वी : 2.1 पृथ्वीचे अंतरंग, 2.1.1 भूकवच, 2.1.2 प्रावरण/अध:स्तर, 2.1.3 गाभा, 2.2 भूखंड व महासागरांच्या वितरणांशी संबंधित सिद्धांत, 2.2.1 वेगनरचा खंडवहन सिद्धांत, 2.2.2 भूमंच विवर्तन सिद्धांत.
  3. खडक आणि विदारण : 3.1 खडक, 3.1.1 खडकांचा अर्थ, 3.1.2 खडकांचे वर्गीकरण, 3.2 विदारण, 3.2.1 विदारणाचा अर्थ, 3.2.2 विदारणाचे प्रकार.
  4. बाह्यशक्तीची कारके : 4.1 नदीचे कार्य, 4.1.1 नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भुरूपे, 4.1.2 नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भुरूपे, 4.2 वाऱ्याचे कार्य, 4.2.1 वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे निर्माण होणारी भुरूपे, 4.2.2 वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे भुआकार.
  5. वातावरण आणि सौरशक्ती : 5.1 वातावरण, 5.1.1 वातावरणाचा अर्थ आणि महत्त्व, 5.1.2 वातावरणाची घटना, 5.1.3 वातावरणाची संरचना, 5.2 सौरशक्ती, 5.2.1 सौरशक्तीचा अर्थ, 5.2.2 सौरशक्तीचे जागतिक वितरण, 5.2.3 सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, 5.3 वातावरणीय तापमान, 5.3.1 तापमानावर परिणाम करणारे घटक, 5.3.2 तापमानाचे वितरण, 5.3.3 तापमान कक्षा, 5.4 तापमानाची विपरितता, 5.4.1 तापमान विपरिततेचे प्रकार, 5.4.2 तापमानाच्या विपरिततेचे महत्त्व.
  6. वातावरणीय दाब आणि वारे : 6.1 वातावरणीय दाब, 6.1.1 वायुभाराचे मापन आणि समभाररेषा, 6.1.2 वातावरणीय दाबावर परिणाम करणारे घटक, 6.1.3 वातावरणीय दाबाचे वितरण, 6.1.4 पृथ्वीवरील प्रमुख वायुभार पट्टे, 6.1.5 वायुभार पट्ट्यांची निर्मिती, 6.1.6 वायुभार पट्ट्यांचे सरकणे आणि त्याचे परिणाम, 6.2 वारे, 6.2.1 वाऱ्यांचे वर्गीकरण.
  7. आर्द्रता आणि वृष्टी : 7.1 आर्द्रता, 7.1.1 आर्द्रतेचा अर्थ, 7.1.2 आर्द्रतेचे प्रकार, 7.2 बाष्पीभवन, 7.3 सांद्रीभवन, 7.4 वृष्टीची रूपे, 7.5 पर्जन्याचे प्रकार, 7.6 मान्सूनची संकल्पना, 7.7 भारतातील पर्जन्याचे वितरण.
  8. जलावरण : 8.1 महासागर तळरचना, 8.1.1 महासागर तळाची सामान्य रचना, 8.1.2 अटलांटिक महासागराची तळरचना, 8.1.3 हिंदी महासागराची तळरचना, 8.2 सागरी प्रवाह, 8.2.1 सागरी प्रवाहाचा अर्थ, 8.2.2 सागरी प्रवाह निर्मितीची कारणे, 8.2.3 अटलांटिक महासागरातील सागरी प्रवाह, 8.2.4 हिंदी महासागरातील सागरी प्रवाह.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्राकृतिक भूगोल”
Shopping cart