Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मराठी

प्रेम प्रस्ताव

Rs.225.00

प्रेम एक अशी भावना जी प्रत्येकजन आपल्या आयुष्यात एकदातरी अनुभवत असतो आणि ते प्रेम जर कॉलेज लाइफ मधले असेल तर त्याची मजाच काही वेगळी असते. प्रेम प्रस्ताव ही अशाच एका प्रेमाची गोष्ट आहे. कॉलेज लाइफचे ते प्रेम आणि त्यामधील अतरंगी गोष्टी यामध्ये भरभरुन पाहायला मिळतात. फ्रेंडशिपच्या चटपटीत दुनियेपासून प्रेमाच्या सुंदर अशा दुनियेची सैर करवणारे हे पुस्तक आहे.
या कथेत मुलगा आणि मुलगी या दोघींची बाजू प्रखरपणे मांडली आहे, ज्यामुळे अनेकांच्या मनातला प्रेमाबद्दलचा विचार ही कथा स्पष्ट करते. आजच्या काळात आकर्षणातुन निर्माण झालेलं प्रेम हे कितपत योग्य वा अयोग्य आहे हे सुद्धा या कथेतुन स्पष्ट होते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येणारा क्षण आहे हा प्रेम प्रस्तावाचा…. परंतु त्याला बोलक करणे वा शब्दात जिवंत करणे मात्र अवघड! म्हणून आपल्या प्रेमाच्या सुवर्ण आठवणींना उजाळा देण्यासाठी नक्कीच हे पुस्तक वाचायला हव!!!
मैत्री आणि प्रेम यांचा खर्‍या आयुष्यातील फरक आणि त्यांचा एकमेकांशी असेलेला संबंध हे पुस्तक एका वेगळ्याच प्रकारे आपल्यासमोर ठेवते. आपल्या सर्वांना आपलेसे वाटणारे आणि खर्‍या प्रेमाची जाणीव करुन देणारे असे हे पुस्तक आहे.

Prem Prastav

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रेम प्रस्ताव”
WordPress › Error

There has been a critical error on this website.

Learn more about troubleshooting WordPress.