Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

तत्वज्ञान / विचार / विचारवंत

राजर्षी शाहू महाराज : व्यक्तित्व, कर्तृत्व आणि विचार

,

Rs.225.00

छत्रपती शाहू महाराज हे बहुजन समाजाचे महानायक, शेतकर्‍यांचा उद्धारकर्ता, दूरदृष्टीचा, विशाल मनाचा राजा व लोकनेते होते. त्यांनी समाजातील बहुजन, मागासलेल्या, तळागाळातील वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता जे अनेक कार्य केले; त्यात गुन्हेगारी जमातीवरील गुन्हेगारीचा शिक्काबंद, मुलांच्या सक्तीच्या शिक्षणासाठी पालकांना दंड, सहकारीत्वाची भावना वाढविणे, जनहितार्थ कायद्याची मांडणी करणे, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणे, विधवा पुनर्विवाह कायदा आणणे, मूलगामी सुधारणा करणे, शेतीसाठीची पाणीव्यवस्था-पाटबंधारे, कोल्हापुरी बंधारे आणि मालासाठी बाजारपेठा व कारखाने यांची उभारणी हे उद्दिष्ट्ये घेवून शाहू महाराजांनी ‘नव्या सामाजिक क्रांती’चा पुरस्कार केला. शिक्षणाची संकल्पना, जातवार नेतृत्व, स्वावलंबन, शिस्त, सहकार्य, नियमितता, सहिष्णूता, देशप्रेम इत्यादी गुणवाढीसाठी प्रयत्न केले. लोकशाही, नवनिर्मितीक्षम आणि सामाजिक सुधारणेचा पाया रचणारे राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षणविषयक धोरण आजही देशाला प्रेरणादायी ठरत आहे. वसतीगृहे, शिष्यवृत्ती, शाळा व नोकरीत राखीव जागांची तरतूद, जातीप्रथेला विरोध, वेठबिगारीला विरोध, स्त्रीशोषणाला विरोध करून वेगवेगळे कायदे अस्तित्वात आणून सामाजिक सुधारणा, बंधुभाव, शिक्षण, कृषी, उद्योग व कला या क्षेत्रात केलेले लोककल्याणकारी कार्य बहुजन समाजाला न्याय हक्क देण्यास उपयुक्त आहे. त्यामुळे अशा राष्ट्रपुरूषाच्या कार्याची दखल घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होवू शकत नाही. म्हणून या थोर माणसाच्या विचार व कार्याला समाजापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. याकरिताच हा लेखनप्रपंच!

Rajrshi Shahu Maharaj : Vyaktitva, Kartutva Ani Vichar

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राजर्षी शाहू महाराज : व्यक्तित्व, कर्तृत्व आणि विचार”
WordPress › Error

There has been a critical error on this website.

Learn more about troubleshooting WordPress.